दुचाकी विक्रीत 17 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली :
मागच्या जुलै महिन्यामध्ये दुचाकी विक्री देशांतर्गंत पातळीवर 17 टक्के वाढीव दिसून आली आहे. नव्या उत्पादनांच्या सादरीकरणामुळे ग्राहकांकडून दुचाकींची मागणी मागच्या महिन्यात वाढलेली पाहायला मिळाली. हेंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया यांच्या दुचाकी विक्रीत दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळाली.
दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरो मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया यानी 4 लाख 83 हजार 100 दुचाकींची विक्री देशांतर्गत पातळीवर जुलैमध्ये केली होती. या सोबतच 43 हजार 982 वाहनांची निर्यात कंपनीने केली आहे. एकंदर विक्रीमध्ये वर्षाच्या पातळीवर 43 टक्के वाढ कंपनीने नोंदविली आहे. जून महिन्यात 5 लाख 18 हजार 799 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती.
दुसरीकडे हिरो मोटोकॉर्प कंपनीने जुलैमध्ये 3 लाख 70 हजार 274 दुचाकींची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता विक्रीत 5 टक्के घसरण दिसून आली आहे. देशांतर्गत बाजारातसुद्धा विक्रीमध्ये घसरण पहावयास मिळाली. कंपनीने जुनमध्ये 3 लाख 71 हजार 204 दुचाकींची विक्री केली होती. ऑटोमोबाईल क्षेत्रातील आणखीन एक कंपनी टीव्हीएस मोटर्सने जुलैमध्ये 3 लाख 39 हजार 676 दुचाकींची विक्री केली आहे. एकंदर दुचाकी विक्रीमध्ये कंपनी तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता 9 टक्के विक्रीत वाढ दिसली आहे. जुलै 2023 मध्ये 3 लाख 12 हजार 307 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती. महिन्याच्या आधारावर पाहता कंपनीच्या दुचाकी विक्रीत 0.58 टक्के इतकी घसरण दिसली. बजाज ऑटोने 11 टक्के वाढीसह जुलैमध्ये 2,97,541 दुचाकींची विक्री केली.