इसीएमएस अंतर्गत 17 नव्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पांना मंजुरी
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात देश अव्वल होणार
नवी दिल्ली : सरकारने इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम (इसीएमएस) अंतर्गत आणखी 17 अर्जांना मंजुरी दिली. यामध्ये कॅमेरा मॉड्यूल तयार करण्यासाठी 3 प्लांट, मल्टी-लेयर प्रिंटेड सर्किट बोर्डसाठी 9 प्लांट, ऑप्टिकल ट्रान्सीव्हर्स तयार करण्यासाठी 2 युनिट आणि मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी युनिटचा समावेश आहे. यासह, इसीएमएस अंतर्गत मंजूर झालेल्या एकूण प्रकल्पांची संख्या आता 24 झाली आहे.
या प्रकल्पामध्ये एकूण गुंतवणूक 7,172 कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे आणि या प्रकल्पांमधून एकूण उत्पादन 65,111 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. गोवा, जम्मू आणि काश्मीर आणि मध्य प्रदेशसह 9 राज्यांमध्ये हे उत्पादन युनिट स्थापन केले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्ये एक्वेस कंझ्युमर प्रोडक्ट्स, जबिल सर्किट इंडिया, जेटवर्कच्या उपकंपन्या जेटफॅब इंडिया आणि जेटकेम सप्लाय चेन सर्व्हिसेस, युनो मिंडा आणि सिरमा एसजीएसची उपकंपनी सिरमा मोबिलिटी यासारख्या स्वदेशी कंपन्या समाविष्ट आहेत.
सर्व घटक एकत्रित करण्यावर लक्ष : मंत्री वैष्णव
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ईसीएमएस योजनेअंतर्गत सर्व घटक एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, सरकारने एका विचारपूर्वक केलेल्या धोरणानुसार मर्यादित आणि विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे.