महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुगल प्ले स्टोअरवरुन 17 कर्ज अॅप्स हटविले

06:49 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्राहकांचा वैयक्तिक डाटा चोरल्याचा आरोप : सायबर सिक्युरीटी फर्म इएसइटीच्या अभ्यासात पुढे आली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टेक दिग्गज कंपनी गुगलने प्ले स्टोअरवरून कर्ज देणारी जवळपास 17 अॅप्स काढून टाकली आहेत. अॅप ग्राहकांची फसवणूक करत होते. यामध्ये स्पाय मालवेअर सापडले आहेत.

सायबर सिक्युरिटी फर्म इएसइटीच्या एका संशोधन अहवालात असे समोर आले आहे की अनेक फसवे इन्स्टंट लोन अॅप्स अँड्रॉइड ग्राहकांना अधिकचे आकर्षित करत आहेत. अहवालात 18 अॅप्सची ओळख पटली होती, त्यापैकी गुगलने 17 अॅप्स काढून टाकले आहेत, तर एका अॅपच्या डेव्हलपर्सनी गुगलच्या नियमांनुसार त्यांचे धोरण बदलले आहे. या कारणास्तव ते प्ले स्टोअरमधून काढले गेले नाही.

तृतीय पक्ष स्रोतांकडील अॅप्स अद्याप सक्रिय आहेत. मात्र, गुगलच्या कारवाईपूर्वी हे अॅप 1.20 कोटी वेळा डाऊनलोड झाले होते. हे अॅप्स आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि एसएमएससारख्या थर्ड पार्टी सोर्सद्वारे टेक्स्ट मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत. हे अॅप्स भारतासह मेक्सिको, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान, कोलंबिया, पेरू, फिलिपाइन्स, इजिप्त, केनिया, नायजेरिया आणि सिंगापूरमध्ये ऑपरेट केले जातात.

रिपोर्टनुसार, झटपट कर्ज देण्याच्या नावाखाली हे अॅप्स कॉल लॉग, स्टोरेज, मीडिया फाइल्स, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि लोकेशन डेटासारख्या अनेक प्रकारच्या परवानग्या बायपास करतात. याशिवाय, ग्राहकांचा वैयक्तिक डेटा मिळविण्यासाठी, त्यांना पत्ता, बँक खाते आणि फोटोसारखे तपशीलदेखील शेअर करण्यास सांगितले जाते.

जीवे मारण्याची धमकी

गुगलच्या प्ले स्टोअर पॉलिसीलाही चुकवत होते. लोकांना या अॅप्सद्वारे झटपट कर्ज मिळते, परंतु त्यासाठी खूप जास्त व्याज आकारले जाते आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी कमी वेळ दिला जातो. ग्राहकांची सर्व माहिती घेतल्यानंतर ते कर्जाची परतफेड करण्यासाठी अॅपला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात. ईएसईटीचे संशोधक लुकास स्टेफान्को यांनी सांगितले की, अॅपधारक हे  लोकांना ब्लॅकमेल करायचे आणि लोन अॅप्सद्वारे जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते.

एवढेच नाही तर ग्राहकांने कर्जासाठी अर्ज केला नसला किंवा कर्ज मंजूर नसले तरी हे अॅप्स अॅपद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करतात.

प्ले स्टोअरवरील अॅप्सबाबत ग्राहकांनी सजग राहावे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते की जेव्हा तुम्ही कोणत्याही सूचीबद्ध कर्ज देणाऱ्या वेबसाइटला किंवा तिच्या अॅपला भेट देता तेव्हा ते आरबीआयकडे नोंदणीकृत आहे का ते निश्चितपणे तपासा किंवा आरबीआयकडे नोंदणीकृत कोणत्याही बँक किंवा एनबीएफसीमध्ये काम करत आहे, हे पाहा. सर्व कर्ज कंपन्यांना त्यांचा कंपनी ओळख क्रमांक आणि नोंदणी प्रमाणपत्र स्पष्टपणे प्रदर्शित करावा लागणार असल्याची माहिती आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article