हिंडलगा-आंबेवाडी रस्त्यावरील धान्य दुकानातून 17 पोती तांदूळ चोरीस
वार्ताहर/हिंडलगा
येथील आंबेवाडी रस्त्यावरील मल्हार एंटरप्राईझेस या तांदूळ मिलच्या बाजूला असलेल्या धान्य दुकानाचा कडीकोयंडा मोडून धान्याची चोरी केली आहे. यामध्ये दिल्ली राईस 17 पोती, तुरडाळ, हरभरा अशा धान्याची चोरी केली आहे. या चोराची छबी सीसी कॅमेरात कैद झाली आहे. शनिवार दि. 3 रोजी रात्री हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोराने सिल्व्हर कलरच्या इंडिका गाडीतून धान्य नेले आहे. या धान्याची किंमत अंदाजे रु. 30,000 होते. चोरांने धान्याशिवाय कुठल्याही वस्तूला हात लावलेला नसून ही चोरी एका चोराने केल्याचे सीसी कॅमेऱ्यातून सिद्ध होत आहे. याबाबतची क्राईम पोलीस स्टेशनला नोंद केली असून, क्राईम पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. व या रस्त्यावरील इतर सीसीटीव्हीतून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. विनायक बाळू पावशे यांचे हे दुकान आहे. आंबेवाडीकडे जाणार हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो, पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोराने ही चोरी केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चोरी माहितगार चोराने केली असल्याचा संशय आहे.