लोकमान्य सोसायटीच्या सावंतवाडी शाखेत उद्या सत्यनारायण महापूजा
04:54 PM Dec 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
१६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य ; सायंकाळी ७ वाजता दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा सावंतवाडीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २० डिसेंबर रोजी सावंतवाडी शाखेमध्ये सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली आहे. तीर्थप्रसाद सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. या विशेष दिनानिमित्त लोकमान्य सोसायटी तर्फे सिंधुदुर्गातील नामांकित दशावतारी कलाकारांचा विशेष संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ''तुळजापूरची तुळजाभवानी'' आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाची सुरुवात शाखेसमोरील मोकळ्या जागेत सायंकाळी ७ वाजता करण्यात येईल. तरी सर्व भाविकांनी, ग्राहकांनी, हितचिंतांनी या संधीचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन शाखा व्यवस्थापक अरविंद परब व क्षेत्रीय व्यवस्थापक श्री बाळासाहेब पांडव यांनी केलेले आहे.
Advertisement
Advertisement