For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौंदत्ती यात्रेसाठी 169 एसटी बस बुकिंग

12:29 PM Dec 09, 2024 IST | Pooja Marathe
सौंदत्ती यात्रेसाठी 169 एसटी बस बुकिंग
169 ST buses booked for Saundatti Yatra
Advertisement
कोल्हापूर
सौदत्ती यात्रेसाठी 169 एसटी बस बुकींग झाल्या आहेत. एसटी महामंडळाकडून आरटीओ ऑफीसमध्ये परमीटची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आहे. सुमारे 7 हजार 300 भाविक एसटी महामंडळाच्या बसने सौदत्ती यात्रीसाठी रवाना होणार आहेत.
सौदत्ती यात्रा 11 ते 17 डिसेंबर दरम्यान आहे. कोल्हापुरातून हजारो भाविक यात्रेसाठी जातात. यामध्ये बहुतांशी भाविक एसटी बस बुकींग करतात. संयोजकांकडून आठ दिवसापासूनच यात्रेसाठी तयारी सुरू झाली आहे. भाविक संयोजकाकडे यात्रेसाठीची  फी जमा करत आहेत. भाविकांच्या संख्येवर संयोजक एसटी बुकींग करतात. एकूण 169 एसटी बस बुकिंग झाल्या आहेत. यामध्ये संभाजीनगर बसस्थानक येथून 151 बस बुकिंग झाल्या असून मध्यवर्ती बसस्थानक येथून 18 बस बुकिंग झाल्या आहेत. यामधील बहुतांशी बसचे परमीट घेण्याची प्रॅक्रिया पूर्ण झाली आहे. आता एसटी महामंडाळाने बुकिंग बंद केले आहे.
 
 तीन दिवस एसटी सेवेवर परिणाम
कोल्हापूर एसटी विभागाकडे एकूण 431 एसटी बस आहेत. बुधवार दि. 11 पासून सौदत्तीसाठी बस रवाना होण्यास सुरवात होणार आहे. तीन दिवस सौदत्तीवर या बस राहणार आहेत. या दरम्यान, कोल्हापुरातील बस सेवेवर परिणाम होणार आहे. 
Advertisement
Advertisement
Tags :

.