बोलीवियात डायनासोरच्या 16,660 पाऊलखुणा
जगात डायनासोरबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध समोर आला आहे. दक्षिण अमेरिकेच्या बोलीवियामध्ये वैज्ञानिकांना एक असे ठिकाण मिळाले आहे, जे कुठल्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. येथे एकाच ठिकाणी डायनसोरच्या 16 हजारांहून अधिक पाऊलखुणा मिळाल्या आहेत. हे जगातील सर्वात मोठे डायनासोर ट्रॅक साइट ठरले आहे. या खुणा जवळपास 7 कोटी वर्षे जुन्या आहेत. त्या काळात पृथ्वीवर क्रेटेशियस काळ सुरु होता, या खुणा क्रूर थेरोपॉड्सच्या असून ते दाने पायांनी चालणारे मांसाहारी डायनासोर होते.
बोलीवियाच्या टॉरोटॉरो नॅशनल पार्कच्या कॅरेरास पम्पामध्ये मिळालेले हे ठिकाण एक प्राचीन समुद्र किनाऱ्यासारखे आहे. येथे 16,600 हून अधिक खुणा एकाच दिशेत मिळाल्या आहेत. यात स्वीम ट्रेसेस देखील सामील आहेत. पोहताना प्राण्याचे पाय जमिनीला हलका स्पर्श करतात तेव्हा या खुणा निर्माण होतात. प्राणी पाण्यात पोहत असताना त्याचे केवळ पंजे खालील जमिनीला टेकतात तेव्हा या खुणा तयार होत असतात. या खुणा एका जुन्या शोरलाइनच्या समांतर निर्माण झाल्या होत्या असे संशोधकांचे मानणे आहे. येथे पाण्याच्या लाटांच्या खुणाही सुरक्षित आढळून आल्या आहेत. एखाद्या समुद्र किनाऱ्याप्रमाणे हे दृश्य दिसून येते.
शिकारीच्या शोधात संचार
आफ्रिकेत प्राण्यांवर झालेल्या आधुनिक अध्ययनातून काही महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. सर्वसाधारणपणे शाकाहारी प्राणी पाणी पिण्यासाठी किनाऱ्याच्या दिशेने थेट येतात, ते खुल्या भागांमध्ये वेगाने संचार करतात, परंतु मांसाहारी प्राणी किनाऱ्यासोबत चालतात, यामुळे त्यांना शिकार मिळण्याची शक्यता अधिक असते. बोलीवियात मिळालेल्या पाऊलखुणा देखील किनाऱ्याच्या समांतर आहेत. परंतु याचा कुठलाच ठोस नियम नाही. पण अनेक खुणा मांसाहारी डायनासोरच्या असू शकतात, जे शिकारीच्या शोधात होते असे वैज्ञानिक मानत आहेत. पीएलओएस वन नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार येथे 1321 ट्रॅकवेज आणि 289 वेगवेगळ्या खुणा मिळाल्या आहेत.
पाऊलखुणांमध्ये कोणते रहस्य
एकूण 16,600 थेरोपॉड ट्रॅक नोंद झाले आहेत, याचबरोबर 280 स्वीम ट्रॅकवेजही मिळाले आहेत. येथे केवळ डायनासोर नव्हते, तर वैज्ञानिकांना त्याच ठिकाणी पक्ष्यांच्या पाऊलखुणाही मिळाल्या आहेत. हे ट्रेसेस अनेकदा खरचटल्यासारखे दिसतात, हे अशा खुणांपासून वेगळे असतात, जे प्राणी जमिनीवर चालताना तयार होतात. हे त्या काळातील पूर्ण इकोसिस्टीमचे एक जिवंत चित्र सादर करते, शेपूट सरपटत नेण्याच्या खुणाही तेथे आहेत.
कुठल्या प्रजातीचा प्राणी
या खुणा पाहून एखाद्या खास प्रजातीचे नाव सांगणे अवघड आहे. एकच प्राणी वेगवेगळ्या जमिनीवर वेगवेगळ्या खुणा सोडू शकतो. माती किती ओली किंवा घट्ट आहे यावर हे निर्भर असते. तसेच जेथे खुणा आढळतात, तेथे हाडं मिळत नाहीत. हाडं आणि खुणा सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळी स्थिती हवी असते. याचमुळे संशोधकांनी त्यांना ‘मॉर्फोटाइप्स’ किंवा वेगवेगळ्या आकृत्यांमध्ये विभागले आहे. येथे कमीतकमी 12 पेक्षा अधिक वेगवेगळ्या आकृत्या मिळाल्या आहेत.