For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा, बडोदा, पालनपूर येथून 16 संशयितांना अटक

01:11 PM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा  बडोदा  पालनपूर येथून 16 संशयितांना अटक
Advertisement

375 सायबर गुन्ह्यांमध्ये 77 कोटींची केली फसवणूक:  गुजरात सीआयडीची कारवाई

Advertisement

पणजी : देशभरात वाढत्या सायबर गुह्यांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सीआयडी  पोलिसांनी तब्बल 77 कोटी ऊपयांच्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गोवा, बडोदा आणि पालनपूर येथे छापे टाकून एकूण 16 संशयितांना अटक केली आहे. त्यात गोव्यातून 9, बडोद्यातून 5 आणि पालनपूरमधून 2 संशयितांना अटक करण्यात आली. संशयितांकडून मोबाईल फोन, चेकबुक, पासबुक, रिकामे धनादेश, राऊटर, सीमकार्ड, पेन ड्राइव्ह, डेबिट कार्ड आणि क्यूआर कोडसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. सीआयडी पोलिसांच्या माहितीनुसार स़ंशयित ‘म्युल’ बँक खात्यांद्वारे फसवणुकीचे पैसे फिरवत असल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी 260 हून अधिक ‘म्युल’ बँक खाती तयार करून देशभरातील सायबर गुह्यांतील रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरली.

या रॅकेटने तब्बल 375 सायबर गुन्हे केले असून एकूण व्यवहार 77 कोटी ऊपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित स्वत:च्या तसेच इतरांच्या नावावर बँक खाती उघडून त्याची माहिती सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गेमिंग घोटाळ्यातील सहकाऱ्यांना पुरवत होते. याशिवाय त्यांनी तीन बनावट कंपन्यांची स्थापना करून या खात्यांचे जाळे अधिक मजबूत केले होते, असे तपासात उघड झाले आहे. लॅपटॉप आणि मोबाईल तपासणीत बँक लॉगिन माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच सायबर फसवणुकीशी संबंधित कागदपत्रे सापडली. तसेच संशयितांचे दुबईसह इतर परदेशातील व्यक्तींशी व्हॉट्सअॅप व टेलिग्रामवर संपर्क असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या रॅकेटचा संबंध आंतरराष्ट्रीय रॅकेटशी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.