जिल्हास्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत दाणोली हायस्कूलचा डंका
१६ विद्यार्थ्यांची विभागीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड
ओटवणे | प्रतिनिधी
दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाने कणकवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत विविध १६ सोळा गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ११ गटांमध्ये द्वितीय तर १० गटांमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. आता या प्रशालेतील एकूण १६ विद्यार्थ्यांची विभागीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत या प्रशालेतील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी विविध गटात सहभाग घेत प्रथम तीन क्रमांकात स्थान पटकाविले.जिल्हास्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत यश संपादन केलेले प्रशालेचे विद्यार्थी पुढील प्रमाणे. १४ वर्षाखालील मुलगे- २५ किलो खालील द्वितीय- सोहम दत्तप्रसाद सावंत, तृतीय - विघ्नेश कृष्णाजी आईर. २९ किलो खालील प्रथम - विराज समीर कानसे. ३३ किलो खालील प्रथम - मयुरेश जानू वरक, द्वितीय -संजय संतोष पाटील. ३७ किलो खालील प्रथम - राज काशीराम जंगले, तृतीय - समर्थ प्रकाश दळवी. ४१ किलो खालील
प्रथम - भागू बाजू जंगले, द्वितीय - सखाराम मनोहर सावंत. ४५ किलो खालील प्रथम - भगवान बाबू पाटील.
१७ वर्षाखालील मुलगे
४० खालील द्वितीय - लक्ष्मण सुरेश जंगले, तृतीय - प्रदीप गंगाराम जंगले, ४४ किलो खालील प्रथम - दत्ताराम प्रकाश दळवी, तृतीय - तुकाराम मधुकर सावंत, ४८ किलो खालील प्रथम - संदेश प्रकाश पाटील, तृतीय - प्रतीक बाबुराव गावडे, ५२ किलो खालील प्रथम - सुनिल बाबुराव जंगले, तृतीय - ओमकार रवींद्र सावंत, ५६ किलो खालील प्रथम - विजय सुरेश जंगले, ६० किलो खालील प्रथम - हनुमंत लक्ष्मण सावंत,
१४ वर्षाखालील मुली
२३ किलो खालील प्रथम- अपूर्वा आनंद सावंत, द्वितीय - शिवानी सिताराम सावंत, २७ किलो खालील द्वितीय - वैदही महेश कासले, ३१ किलो खालील प्रथम - तन्मय महेंद्र सावंत, द्वितीय - चैताली विजय गावडे, ३५ किलो खालील प्रथम - राशी बाबली परब, द्वितीय - गार्गी रवींद्र वनारी, ३९ किलो खालील तृतीय - चिन्मय गजानन सावंत, ४१ किलो वरील द्वितीय- रितिका रावजी सावंत तृतीय- अनुष्का आनंद कांबळे.
१७ वर्षाखालील मुली
३६ किलो खालील द्वितीय - भाग्यश्री शांताराम जंगले, तृतीय - सुरेखा बिरू काळे, ४० किलो खालील प्रथम- प्रियांका काशीराम जंगले, ४४ किलो खालील तृतीय - ऐश्वर्या शामराव पाटील, ४८ किलो खालील द्वितीय - आर्या गजानन सावंत, ५६ किलो खालील प्रथम - रंजना देवू पाटील, ५६ किलो वरील प्रथम- श्रावणी विजय सावंत.
कणकवली विद्यामंदिर येथे झालेल्या या जिल्हास्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कांबळे यांच्याहस्ते झाले. यावेळी दाणोली हायस्कूलचे पी. एन. देसाई, क्रिडा शिक्षक आर. जी. पाटील, क्रिडाधिकारी श्रीम. शिंदे, पंच ओमकार लाड व अन्य क्रिडा शिक्षक उपस्थित होते. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांसह प्रशालेचे क्रिडा शिक्षक आर जी पाटील यांचे शाळेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.