महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वे मालवाहतूक महसुलात 16 टक्क्यांची वाढ

06:59 AM Dec 03, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्या आठ  महिन्यातील कामगिरीची आकडेवारी

Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

  चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यात रेल्वेच्या मालवाहतूक आणि महसूलात लक्षणीय वाढ झाली आहे. रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल-नोव्हेंबर 2022 या कालावधीत 97.87 कोटी टन मालाची ने-आण रेल्वेच्या माध्यमातून झाली आहे, जी वर्षापूर्वी याच कालावधीत 90.31 कोटी टन होती. अशाप्रकारे या कालावधीत रेल्वेच्या मालवाहतुकीत 8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असल्याची माहिती
आहे. 

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात रेल्वेने मालवाहतुकीतून 1,05,905 कोटी रुपये कमावले, जे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 16 टक्के अधिक आहेत. एप्रिल-नोव्हेंबर 2021 मध्ये मालवाहतुकीतून रेल्वेने 91,127 कोटी रुपयांचा महसूल कमावला होता. रेल्वेने नोव्हेंबर महिन्यात 12.39 कोटी टन मालाची वाहतूक केली जी नोव्हेंबर 2021 मधील 11.69 कोटी टनापेक्षा 5 टक्के अधिक आहे. ‘हंग्री फॉर कार्गो’ मोहिमेअंतर्गत मालवाहतुकीला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वेने हे यश मिळवल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article