For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इजिप्तच्या दक्षिण सिनाईमध्ये बस पलटल्याने 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

07:00 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इजिप्तच्या दक्षिण सिनाईमध्ये बस पलटल्याने 16 जणांचा मृत्यू  28 जखमी
Advertisement

कैरो : इजिप्तच्या दक्षिण सिनाई भागात दहाब-नुवैबा मार्गावर बुधवारी एक भीषण बस दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने या दुर्घटनेची अधिकृत पुष्टी दिली आहे. ही दुर्घटना लाल समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात घडली आहे. हा भाग पर्यटकांदरम्यान अत्यंत लोकप्रिय अन् व्यग्र मानला जातो. बस कोणत्या कारणांमुळे दुर्घटनाग्रस्त झाली याचा तपास केला जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मदत अन् बचाव पथकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.  इजिप्तमध्ये एक महिन्यापूर्वी देखील एक भीषण बस दुर्घटना घडली होती. इजिप्तच्या इस्माइलिया गव्हर्नरेटमध्ये झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता आणि 32 जण जखमी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.