महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केंद्र सरकारकडून 156 औषधांवर बंदी

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

आणखी 156 औषधांवर बंदी घातल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ही औषधे निश्चित प्रमाणातील मिश्रणांच्या स्वरुपातील आहेत. ती व्यापक प्रमाणात उपयोगात असून लोकप्रियही आहेत. तथापि, त्यांच्या उपयोगामुळे मानवी प्रकृतीवर गंभीर परिणाम होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याने ही बंदी घालण्यात आली आहे, असे केंद्र सरकारच्या औषध नियंत्रक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या औषधांना फिक्स्ड डोस काँबिनेशन (एफडीसी) असे संबोधले जाते. 12 ऑगस्टलाही अशा अनेक मिश्रणांवर बंदी घालण्यात आली होती. ताप, अॅलर्जी, सर्दी, त्वचाविकार, कळा येणे अशा विविध सर्वसामान्य विकारांवर या औषधांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, यापुढे तो करता येणार नाही.

Advertisement

परिणाम कोणावर होणार

या बंदीचा परिणाम, सिप्ला, डॉ. रे•ाrज लॅब, सन फार्मा, टोरेंट आणि अल्केम अशा अनेक प्रख्यात कंपन्यांच्या लोकप्रिय औषध मिश्रणांवर होणार आहे. 15 एंझाईम्सवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच 20 औषधी सूत्रांवरही बंदी घोषित करण्यात आली आहे. सेटीरिझाईन आणि फिनाईलफ्रिन हैड्रोक्लोराईड, पॅरासिटेमॉल आणि पेंटाझोसाईन, पॅरासिटेमॉल आणि मेफेनामिक अॅसीड, तसेच पॅरासिटेमॉल, डिक्लोफॅनॅक पोटॅशियम आणि कॅफिन अनहैड्रस या मिश्र औषधांचा बंदी घातलेल्या औषधांमध्ये समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

1980 पासून प्रारंभ

एफडीसी औषधे भारतीय बाजारांमध्ये येण्यास 1980 पासून प्रारंभ झाला आहे. मात्र अशा प्रकारची कित्येक औषधे अतार्किक आणि अयोग्य मिश्रणांपासून बनलेली आहेत, हे समजून येण्यास 2012 हे वर्ष उजाडले. त्यानंतर पुढची 2 वर्षे विशेष कारवाई झाली नाही. 2015 पासून केंद्र सरकारने अशा अयोग्य मिश्रणांविरोधात आघाडी उघडली आणि आतापर्यंत 600 हून अधिक एफडीसी औषधे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article