For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सव्वा वर्षात दिडशे वीज अपघात

05:27 PM Jul 24, 2025 IST | Radhika Patil
सव्वा वर्षात दिडशे वीज अपघात
Advertisement

सांगली :

Advertisement

विजेच्या उपकरणांवर काम करताना सुरक्षितता व साक्षरता बाळगणे गरजेचे आहे कारण वीज चुकीला माफी देत नाही. मात्र आजही वीज सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याने १५ महिन्यांत कोल्हापूर परिमंडलात १२३ वीज अपघात झाले आहेत. यामध्ये ७५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर ४८ जण जखमी झाले. यामुळे संबंधित कुटुंबाची न भरून येणारी हानी झाली आहे. विजेबाबत ग्राहकांनी त्यांच्या घरात, परिसरात, शेतात काम करताना योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.

महावितरणच्या वतीने १ त ६ जून या कालावधीत राज्यभरात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करून वीज अपघाताबाबत जागृती केली जाते. घरगुती वीज अपघातांची संख्या काही अंशी कमी झाली आहे. मात्र शेतात काम करताना, बांधकाम करताना, घरातील व शेतातील पाण्याची मोटर हाताळताना, बा-'धकामावर पाणी मारताना, कडबाकुट्टीवर काम करताना तसेच इत्यादी कामे करताना वीज सुरक्षेची काळजी न घेतल्याने १५ महिन्यांत ७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७० (कोल्हापूर ४२, सांगली २८) जनावरे दगावली आहेत.

Advertisement

सांगली जिल्ह्यात वीज उतरलेल्या जोडणी व उपकरणांमुळे १६, वीज चोरी व अनधिकृत जोडणीमुळे ४, खराब उपकरणांमुळे ९ आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने १ अ-पघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विजेबाबत सजगता राखून नागरिकांना हे अपघात पूर्णपणे टाळता येऊ शकतात.

कधीही ओल्या हातांनी विद्युत उपकरणे हाताळू नका. पायात रबरी चप्पल किंवा बूट घाला. घरातील वायरिंग वीज भारानुसार योग्य क्षमतेचे आणि गुणवत्तेचे असल्याची खात्री करा. विद्युत पुरवठा वारंवार चालू बंद होत असल्यास किंवा कमी दाबाचा होत असल्यास विद्युत उपकरणे बंद करून ठेवा. प्लग सॉकेट मध्ये उघड्या वायर्स खोचणे टाळा. पॉवर पॉईंट्स लहान मुलांच्या हातास लागणार नाहीत अशा उंचीवर लावा. विजेवरील उपकरणे हाताळताना नेहमी विद्युत पुरवठा बंद करा.

वीजपुरवठा खंडित झाल्यास, अनाधिकृत आणि अप्रशिक्षित व्यक्तींकडून महावितरण विद्युत यंत्रणेतील कोणतेही काम करून घेऊ नका, हे धोकादायक आणि जीवघेणे ठरू शकते, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

  • विजेची कामे करताना सावधता बाळगावी

सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत संच मांडणीत रेसिड्युयल करंट सर्किट ब्रेकर बसवणे आवश्यक आहे. आर्थिग सुस्थितीत असल्याची खात्री करावी. घरातील आणि दुकानातील स्विच बोर्ड आणि विद्युत उपकरणे पाण्याच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या. वायरिंग ठिकठिकाणी जोडलेली नसावी आणि ती घराच्या/शेडच्या पत्र्यापासून किंवा लोखंडी अँगलपासून सुरक्षित असल्याचे तपासा. वीज यंत्रणेस जनावरांना बांधू नये.

Advertisement
Tags :

.