विदेशी गुंतवणूकदारांनी 15 हजार कोटी गुंतवले
वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मागच्या आठवड्यात बाजारामध्ये 15 हजार कोटी रुपयांची भर घातली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आत्तापर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी देशातील डेट बाजारामध्ये 15 हजार कोटी रुपयांची भर घातली आहे.
भारत सरकारच्या बॉण्डचा समावेश जेपी मॉर्गन निर्देशांकामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्याचप्रमाणे स्थिर अर्थव्यवस्थेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणे पसंत केले आहे. जानेवारी महिन्यामध्ये 19836 कोटी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात केली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये पाहता जानेवारीतली गुंतवणूक ही सर्वाधिक मानली जात आहे. याआधी सर्वाधिक जून 2017 मध्ये 25,685 कोटी रुपयांची शेअरबाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी बाजारांमधून 3000 कोटी रुपये काढले असल्याचेही सांगितले जात आहे.