रशियात 15 दहशतवाद्यांना अटक, आक्षेपार्ह सामग्री हस्तगत
06:41 AM Sep 25, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ मॉस्को
Advertisement
रशियाच्या उत्तर काकेशस क्षेत्रातील काबर्डिनो-बाल्केरियन प्रजासत्ताकमध्ये सुरक्षा यंत्रणांनी 15 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रs अन् आक्षेपार्ह सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. रशियाच्या उत्तर काकेशस क्षेत्रात मुस्लीमधर्मीयांचे प्रमाण अधिक आहे. या भागात फुटिरवादी संघटना कार्यरत असल्याचे मानले जाते.
Advertisement
हे दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून कारवायांचे प्लॅनिंग करत होते. बक्सन जिल्ह्यातील इस्लामेय गावात करण्यात आलेल्या एकूण 15 रशियन नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती संघीय सुरक्षा सेवेने (एफएसबी) दिली आहे. हे दहशतवादी कट्टरवादी विचारसरणीच्या प्रसारासोबत धार्मिक द्वेषाने प्रेरित कृत्यं घडवून आणू पाहत होते असे एफएसबीकडून सांगण्यात आले.
Advertisement
Next Article