कणकवलीत पहिल्या दोन तासात 15 टक्के मतदान
09:51 AM Dec 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कणकवली / प्रतिनिधी
Advertisement
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळच्या पहिल्या सत्रापूर्वीपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. पहिल्या दोन तासात सुमारे 15 टक्के मतदान झाले आहे.शहरातील 17 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले आहे. 9.30 वाजेपर्यंतच्या दोन तासात 13278 मतदारांपैकी 2103 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून येतो होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement