Kolhapur News : बालिंगा गर्भलिंग निदान प्रकरणात 15 जण पोलिसांच्या रडारवर!
बालिंगा येथे अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश
कोल्हापूर : बालिंगा येथील अवैध गर्भलिंग निदानप्रकरणी एजंट, गर्भपात करणारे डॉक्टर असे १५ जण करवीर पोलिसांच्या रडारावर आहेत. मुख्य सुत्रधार सौरभकेरबा पाटील याच्यासह या १५ जणांचा शोध सुरु आहे. दरम्यान गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या कर्नाटक येथून खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालिंगा येथील एका घरामध्ये सोमवारी दुपारी करवीर पोलिसांनी छापा टाकून एजंट दिगंबर मारुती किल्लेदार (४८, रा. तिटवे, ता. राधानगरी) याला अटक करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाला गर्भलिंग तपासणी मशीनसह गर्भपाताच्या गोळ्या सापडल्या होत्या. मात्र, मुख्य आरोपी बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (वय ३४, रा. बालिंगा (ता. करवीर) हा पसार झाला आहे. स्वप्नीलचा भाउ सौरभ केरबा पाटील (रा. बालिंगा) याच्या नावावर हे घर असल्याची माहिती तपासात समोर व्याप्ती आले आहे.
स्वप्नील पाटील याच्या शोधासाठी करवीर पोलिसांचे एक पथक रवाना झाले असून, सौरभलाही अटक करण्यात येणार आहे. या गुन्ह्यासाठी गर्भलिंग तपासणी मशीन आणि गर्भपाताची औषधे कोणाकडून आणली याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
गर्भपाताची औषधे कर्नाटकातून
९८ छाप्यादरम्यान गर्भपाताच्या गोळ्यांचे कीट जप्त करण्यात आले. त्यामुळे याच ठिकाणी गर्भपाताचे औषध दिले जात असल्याचे स्पष्ट झाले. या गोळ्या कोणाकडून मिळाल्या याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. यापूर्वी झालेल्या कारवाईवेळी पाटील याच्याकडील सोनोग्राफी मशीन जप्त केल्या होत्या. आता पुन्हा त्याच्याकडे मिळालेली मशीन कर्नाटकातून आणल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एजंट, गर्भपात करणारे डॉक्टर रडारावर
गर्भलिंग निदान केंद्रासाठी वापरलेले घर स्वप्निल याचा सख्खा भाऊ सौरभपाटील याचे आहे. त्याच्यासह सुमारे १५ एजंटची नावे पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहेत. या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचा गुन्ह्यातील सहभाग तपासण्यात येणार आहे. यामध्ये एजंट, बोगस डॉक्टर, आणी गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांच्या नावांचा समावेश आहे.