For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरविंद सावंत ,भास्कर जाधवांसह १५ जणांची निर्दोष मुक्तता

04:08 PM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
अरविंद सावंत  भास्कर जाधवांसह १५ जणांची निर्दोष मुक्तता
Advertisement

मनाई आदेशांचे उल्लंघन करून कुडाळ एसीबी कार्यालयावर काढला होता मोर्चा ; ॲड. सुधीर राऊळ यांचा युक्तिवाद

Advertisement

कुडाळ -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ मोर्चा काढून आणि सभा घेऊन जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून शिवसेना नेते व खासदार अरविंद गणपत सावंत ( रा. मुबई) , शिवसेना नेते व आमदार भास्कर भाऊराव जाधव ( रा.गुहागर - रत्नागिरी ) यांच्यासह पंधरा जणांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.ए.कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयीतांच्यावतीने अँड सुधीर राऊळ यांनी काम पाहिले 18 ऑक्टोबर 2022 रोजी कुडाळ येथील शिवसेना ( उबाठा ) शाखा कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( सिंधुदुर्ग ) कार्यालय (कुडाळ) असा निषेध मोर्चा काढण्यात आला होता.तसेच येथील महिला बाल रुग्णालय नजीक सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हादंडाधिकारी ( जिल्हाधिकारी) यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अरविंद सावंत, भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(ब), ३७(३) सह कलम १३५ अन्वये कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच या गुन्ह्याचे दोषारोपपत्र येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या खटल्यात कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून अरविंद सावंत, भास्कर जाधव यांच्यासह अरुण दुधवडकर,संदेश पारकर, संजय पडते , सतीश सावंत, गौरीशंकर खोत,जान्हवी सावंत,अमित सामंत,इर्शाद शेख, राजन नाईक,संतोष शिरसाट,अभय शिरसाट,अतुल बंगे व रुपेश पावसकर यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.