सुदानमधील हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू
07:00 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
दारफूर : उत्तर आफ्रिकी देश सुदानमधील उत्तर दारफूरची राजधानी अल-फाशेर येथे रॅपिड सपोर्ट फोर्सेसने (आरएसएफ) केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले. तसेच अन्य 12 जण जखमी झाले. हा हल्ला बाजारपेठेमध्ये एका वर्दळीच्या ठिकाणी झाला. काही दिवसांपूर्वीच ‘आरएसएफ’ने शहरातील एका मशिदीवर हल्ला केल्यामुळे 70 हून अधिक लोक मारले गेले होते. स्थानिक प्रशासनाने याला ‘क्रूर हल्ला’ असे संबोधले होते. ‘आरएसएफ’ने या घटनेवर अधिकृतपणे भाष्य केले नव्हते. 2023 मध्ये सुरू झालेली ‘आरएसएफ’ आणि सैन्यातील लढाई गृहयुद्धात रूपांतरित झाली असून त्यामध्ये आतापर्यंत 40,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच 1.2 कोटी लोक विस्थापित झाले आहेत. तसेच 2.4 कोटी लोक अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत.
Advertisement
Advertisement