महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटन वृद्धीसाठी तीन वर्षांत सरकार खर्च करणार 15 कोटी

12:13 PM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबईस्थित कॉन्सेप्ट कम्युनिकेशन्सची नियुक्ती

Advertisement

पणजी : राज्यात पर्यटन वाढीसाठी जनसंपर्क आणि मार्केटिंग यावर पुढील तीन वर्षात राज्य सरकार तब्बल 15 कोटी ऊपये खर्च करणार आहे. त्यासाठी सरकारने मुंबईस्थित कॉन्सेप्ट कम्युनिकेशन्स या सेवा पुरवठादार कंपनीची नियुक्ती केली आहे. वर्ष 2019 मध्ये 8 दशलक्षापेक्षा अधिक पर्यटकांनी राज्याला भेट दिली होती. त्यापैकी 10 टक्के पर्यटक हे विदेशी नागरिक होते. गोवा हे पर्यटनासाठी लोकप्रिय स्थळ बनविण्यास इच्छुक असलेल्या पर्यटन खात्याने त्यासाठी जनसंपर्क आणि मार्केटिंग सपोर्टसाठी सेवा पुरवठादार नियुक्त करण्याच्या उद्देशाने ई-निविदा जारी केली होती. त्यास प्रतिसाद म्हणून परसेप्ट लिमिटेड, कॉन्सेप्ट कम्युनिकेशन्स आणि व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिसेस या तीन आस्थापनांकडून अर्ज प्राप्त झाले होते. सदर सर्व संस्था मुंबईस्थित होत्या, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सदर तांत्रिक निविदा गत 23 जून रोजी उघडण्यात आल्या होत्या. त्यांचे मूल्यमापन केल्यानंतर सर्व बोलीदारांनी पात्रता निकषांची पूर्तता केल्याचे आढळले होते. त्यामुळे त्यांना पर्यटन मंडळाच्या अधिकारप्राप्त समितीसमोर तांत्रिक सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले. आर्थिक निविदा उघडण्यात आल्या तेव्हा कॉन्सेप्ट कम्युनिकेशन्सद्वारे लावलेली बोली सर्वात कमी दराची असल्याचे आढळले. त्यामुळे त्याच आस्थापनाला कंत्राट बहाल करण्यात आले. हा प्रस्ताव वित्त खात्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला तेव्हा पर्यटन खात्याने त्या कंपनीकडे पुढील वाटाघाटी कराव्या, असे समितीने सुचवले. त्यानुसार सदर कंपनीने रकमेत दोन टक्क्यांची कपात केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article