शिमगोत्सवासाठी ११ पासून धावणार १५ जादा बसेस
जादा बसफेऱ्यांचे आरक्षणही खुले, चाकरमान्यांना दिलासा
खेड
१३ मार्चपासून शिमगोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. होळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांना एसटी बसेसचा पर्याय उरला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने कोकणात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ११ मार्चपासून १५ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
चिपळूण मार्गे ४ बसेसच्या फेऱ्या ११ मार्चपासून धावणार आहेत. सकाळी ५.३० वाजता व रात्री ८.४५ वाजता बोरिवली-चिपळूण, सकाळी ८.३० वाजता व रात्री ८.३० वाजता ठाणे-चिपळूण, सकाळी ५.४५ वाजता व रात्री ८.३० वाजता विठ्ठलवाडी-चिपळूण, रात्री ९.३० वाजता विठ्ठलवाडी-चिंद्रवली गराटेवाडी जादा बसेस धावणार आहेत. महाड, पोलादपूर मार्गे येणाऱ्या गाड्यांमध्ये सकाळी ८ वाजता व रात्री ११.३० वाजता ठाणे-महाड, दुपारी २.३० वाजता ठाणे-पोलादपूर, दुपारी १ वाजता नालासोपारा-कुथिल बसफेरीचा समावेश आहे.
देवरूख-साखरपामार्गे धावणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये रात्री ८ वाजता ठाणे-साखरपा, रात्री १०.१५ वाजता विठ्ठलवाडी-साखरपा, रात्री ८ वाजता भिवंडी-देवरुख, लांजा, राजापूरमार्गे धावणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये सायंकाळी ६ वाजता व ६.३० वाजता बोरिवली-लांजा, सायंकाळी ५ वाजता मुंबई-लांजा, सायंकाळी ६ वाजता कल्याण-लांजा बसफेरीचा समावेश आहे. सकाळी ६ वाजता अंबरनाथ-तळीये, सकाळी ६ वाजता व ७.१५ वाजता विठ्ठलवाडी-दिवे आगार बसफेरीचा समावेश आहे. या बसफेऱ्यांचे आरक्षणही सुरू झाले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन कोकण एसटीप्रेमी ग्रुपचे जनसंपर्कप्रमुख साहिल हुंबरे यांनी केले आहे.