For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम कामगारांचे प्रलंबित १४,९०५ ऑनलाईन लाभ अर्ज ऑक्टोबर अखेर पर्यंत मंजूर होणार

बांधकाम कामगारांचे प्रलंबित १४ ९०५ ऑनलाईन लाभ अर्ज ऑक्टोबर अखेर पर्यंत मंजूर होणार
Advertisement

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य ऑनलाईन लाभाचे एकुण अर्ज १४,९०५ एवढे मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली असून, लवकरच ते सर्व लाभ अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच ठेकेदार यांच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी करणाऱ्या बोगस कामगारा व संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सरकारी कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी सांगितल्याची माहीती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री भगवान साटम व जिल्हा सचिव श्री हेमंतकुमार परब यांनी दिली.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व अन्य लाभाचे ऑनलाईन अर्ज मागील दीड वर्षापासून प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच बांधकाम कामगारांच्या अन्य प्रश्नांबाबत आज सरकारी कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बांधकाम कामगार महासंघ जिल्हा पदाधिकाऱ्यां सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, जिल्हा अध्यक्ष भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब व जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव तसेच दुकाने निरीक्षक रविराज हुंबे, कन्ट्राटी कनिष्ठ लीपीक सुर्यकांत परब हे उपस्थित होते या वेळी प्रलंबित ऑनलाईन लाभ अर्जाबाबत चर्चा करताना कुडाळ - २४१६, कणकवली - ३७४९, मालवण - २३०८, वेंगुर्ले - १६२३, सावंतवाडी - १७८५, देवगड - २६३४, वैभववाडी - ३३४, व दोडामार्ग - ५६ एवढे प्रलंबित आहेत ते तातडीने मंजूर करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली असता, सदर लाभ अर्ज मंजूर करण्यास सुरुवात करण्यात आली असून, सदर लाभ अर्ज ऑक्टोबर २०२६ अखेर पर्यंत मंजूर करून ते मंडळास सादर होतील. याबाबतची तातडीने कारवाई करण्यात येईल असे कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.