महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमानातील इंधन गळतीमुळे 149 प्रवासी अडचणीत

06:03 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दाबोळी विमानतळावरील घटना, दुरुस्तीनंतर संध्याकाळी दुबईला प्रयाण

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

Advertisement

दाबोळी विमानतळावरून दुबईला प्रयाण करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या एका विमानात इंधन गळती आढळून आल्याने या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. शुक्रवारी रात्री हा प्रकार आढळून आला. या विमानात 149 प्रवासी होते. दुरूस्तीनंतर शनिवारी संध्याकाळी या विमानाने 107 प्रवाशांसह दुबईला प्रयाण केले.

एअर इंडिया कंपनीचे हे विमान शुक्रवारी रात्री दुबईला उड्डाण करणार होते. मात्र, उड्डाण करण्यापूर्वी होणाऱ्या नियमित चाचणीच्यावेळी या विमानातून इंधन गळती होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रात्रीचे विमानोड्डाण रद्द करण्यात आले. या समस्येमुळे दुबईकडे जाणारे 149 प्रवासी अडचणीत सापडले. शनिवारी पहाटेपासून शनिवारी संध्याकाळपर्यंत या विमानाचे दुरूस्तीकाम पूर्ण करण्यात आले. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर संध्याकाळी या विमानाने 107 प्रवाशांसह दुबईला उड्डाण केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article