For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक आर्मीच्या हल्ल्यात 145 बलुच दहशतवादी ठार

06:21 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाक आर्मीच्या हल्ल्यात 145 बलुच दहशतवादी ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ क्वेट्टा

Advertisement

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात 145 बलूच दहशतवाद्यांना मारले आहे, अशी माहिती बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी क्वेटा येथे दिली. चाळीस तासाहून अधिक काळ पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ही मोहिम चालवली होती. तत्पूर्वी बलुच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यात 84 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. तर अनेक शासकीय कार्यालये, वाहनांचे जाळपोळीत नुकसान झाले होते. त्यानंतर पाकिस्तानीने सेनेने त्यांच्याविरोधात कारवाई मोहिम सुरु केली. या हल्ल्यामध्ये बीएलएचे मोठे नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यात 92 दहशतवादी ठार झाले. तर रविवारी सायंकाळपर्यंत हा आकडा 145 झाल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएलए विरोधात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवाईत बलुच दहशतवादी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ठार झाल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.