कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डोंगरावर 1400 पोलीस, 30 सिसीटीव्ही, 6 ड्रोन

01:32 PM Apr 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

वाडी रत्नागिरी येथील श्रीक्षेत्र जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज (शनिवार) संपन्न होत आहे. यासाठी महाराष्ट्रासहृ कर्नाटक, आंध्रप्रदेश येथुन लाखो भाविक सासनकाठ्यांसह जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी 1400 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीला 30 सिसीटीव्ही कॅमेरे, 6 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रासह-कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पोलिस व जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आज (शनिवारी 12) यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविक डोंगरावर दाखल होतात. सासनकाठ्या व पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. अशा वेळी दर्शनरांगेत चेंगराचेंगरी होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. परजिह्यातील पोलिस बळ मागवले आहे. एकूण 1400 पोलीस अधिकरी कर्मचारी आणि 1200 होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दुचाकींसह चारचाकी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच मुख्य यात्रेच्या दिवशी पार्किंग स्थळांपासून भाविकांना डोंगरावर जाण्यासाठी केएमटीच्याही बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पोलिस अधीक्षक 1

अप्पर अधीक्षक 2

पोलिस उपअधीक्षक 8

पोलिस निरीक्षक 32

सह. पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक 88

वाहतूक पोलिस 80

पोलिस शिपाई 1110

होमगार्ड 1200

एसआयपीएफ 1 तुकडी

जोतिबा यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रपदेश येथून भाविक येतात. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होते. यासाठी उजळाईवाडी येथील महामार्ग सुरक्षा पथकही सज्ज झाले आहे. महामार्ग पोलिसांच्या वतीने महामार्गावरील वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पोलीस उपनिरीक्षक, 75 पोलीस कर्मचारी दोन दिवस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. कराड, सांगली, भुईंज येथून 36 कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस बंदोबस्ताचा आढावा घेतला. शुक्रवारी सकाळी बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले आहे. शुक्रवार सकाळपासूनच बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसर व सेंट्रल प्लाझा या दोन्ही स्थळांची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोतिबा परिसरात 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. डोंगरावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. याचसोबत जोतिबा डोंगरावरील गर्दीवर नजर ठेवण्यासाठी 6 ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. ड्रोनमधील कॅमेऱ्यांचे नियंत्रण डोंगरावर नियंत्रण कक्षातून घेतले जाणार आहे. याद्वारे जेथे गर्दी होईल तेथील पोलिसांना तात्काळ सुचना देवून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article