For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

14 वर्षीय श्रेय पारिख ‘स्पेलिंग बी’ विजेता

06:53 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
14 वर्षीय श्रेय पारिख ‘स्पेलिंग बी’ विजेता
Advertisement

सलग पाचव्या वर्षी ‘भारतीयां’ची चमक : इशान गुप्ताला दुसरे स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेतील सर्वात कठीण स्पर्धा मानली जाणारी क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चा विजेता ठरण्याचा मान 14 वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी श्रेय पारिख याला मिळाला आहे. कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या श्रेय पारिखने 90 सेकंदात 32 शब्द अचूकपणे लिहून न्यू जर्सीच्या 12 वर्षीय इशान गुप्तावर मात केली. कॅलिफोर्नियातील रँचो कुकामोंगा येथे राहणारा श्रेय पारिख आठवी इयत्तेत शिकत आहे. या विजयामुळे त्याला 50,000 डॉलर्सची बक्षीस रक्कम आणि प्रतिष्ठित क्रिप्स कप मिळाला आहे.

Advertisement

सलग पाचव्यांदा एखाद्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याने स्पेलिंग बी जिंकली आहे. भारतीय-अमेरिकन इशान गुप्ता दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यंदा ही स्पर्धा इतकी चुरशीची होती की अंतिम विजेता निश्चित करण्यासाठी 9 फेऱ्या पार कराव्या लागल्या. या स्पेलिंग स्पर्धेत 90 सेकंदात शक्य तितके जास्त शब्द अचूकपणे लिहायचे असतात. श्रेयने 35 पैकी 32 शब्द अचूक लिहून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. तर इशानने 25 शब्द अचूक लिहिले.

Advertisement
Tags :

.