For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरळात निपाह व्हायरसने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

06:36 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
केरळात निपाह व्हायरसने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू
Advertisement

राज्यात 2018 नंतर पाचव्यांदा संसर्ग

Advertisement

► वृत्तसंस्था/ मलप्पुरम

केरळमधील मलप्पुरममध्ये रविवारी निपाह व्हायरसने ग्रस्त एका 14 वषीय मुलाचा मृत्यू झाल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. निपाहग्रस्त मुलाची प्रकृती शनिवारी रात्रीपासून अधिकच चिंताजनक झाल्याने त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. याचदरम्यान रविवारी सकाळी 11.30 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात निपाह संसर्गाचा धोका वाढला असून मृत मुलाच्या संपर्कात आलेल्या तीन नातेवाईकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

Advertisement

संक्रमित मुलाला ऑस्ट्रेलियातून मोनोक्लोनल अँटीबॉडीज देण्यात आल्या होत्या. प्रोटोकॉलनुसार, संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसांच्या आत दिले जाते. या प्रकरणात, बाधित मुलाला अँटीबॉडीज देण्यास विलंब झाला. मुलाचे अंत्यसंस्कार आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केरळमध्ये 2018 पासून पाचव्यांदा निपाह संसर्ग पसरला आहे. यानंतर 2019, 2021 आणि 2023 मध्येही त्याची प्रकरणे आढळून आली. त्यानंतर आता 2024 मध्येही संसर्ग पसरल्यामुळे सतर्कता बाळगली जात आहे. निपाहवर अद्याप कोणतीही लस तयार केलेली नाही. निपाह संक्रमित वटवाघुळ, डुक्कर किंवा माणसांच्या शरीरातील द्रवांच्या संपर्कातून पसरतो. निपाहची लागण झालेल्या लोकांच्या 75 टक्के प्रकरणांमध्ये संक्रमित व्यक्तीचा मृत्यू होतो. निपाहचा संसर्ग वाढल्यानंतर आरोग्य विभागाने मांजरी मेडिकल कॉलेजमध्ये 30 आयसोलेशन रूम आणि 6 खाटांचे आयसीयू तयार केले आहेत.

3 नातेवाईक देखरेखीखाली

मृत्यू झालेल्या मुलाचे वडील आणि काका यांच्यासह तीन जवळचे नातेवाईक कोझिकोडच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या निरीक्षणाखाली आहेत. तर उर्वरित चार परिचितांना मलप्पुरम येथील मंजेरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी एक आयसीयूमध्ये आहे.

Advertisement
Tags :

.