For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑटोमोबाईल निर्यातीत 14 टक्क्यांनी वाढ

06:50 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑटोमोबाईल निर्यातीत 14 टक्क्यांनी वाढ
Advertisement

भारतीय कंपन्यांची विदेशी बाजारपेठेत 25.28 लाख वाहनांची विक्री : सियामची माहिती

Advertisement

नवी दिल्ली :

जगभरात भारतीय कार्सची मागणी पुन्हा एकदा वाढत आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या ताज्या अहवालानुसार, भारताच्या ऑटोमोबाईल निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्के वाढ झाली आहे. भारतीय कंपन्यांनी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत विदेशी बाजारपेठेत 25,28,248 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 22,11,457 होता.

Advertisement

मारुती सुझुकीची कामगिरी- कंपनीच्या निर्यातीत 12 टक्के वाढ

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 1,47,063 वाहनांची निर्यात करून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. वर्षापूर्वी याच कालावधीत हा आकडा 1,31,546 होता. त्यात वर्षानुवर्षे 12 टक्के वाढ झाली आहे.

दुचाकी निर्यात 16 टक्के वाढून 19.59 लाख

दुचाकींची निर्यात चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत वर्षाच्या तुलनेत 16 टक्के वाढून 19,59,145 वर पोहोचली, जी मागील वर्षी याच कालावधीत 16,85,907 होती. 2024 च्या संपूर्ण आर्थिक वर्षात भारतीय बाजारातून 34.59 लाख दुचाकींची निर्यात करण्यात आली. एकूण प्रवासी वाहनांची निर्यात 12 टक्केने वाढून 3.77 लाख झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण प्रवासी वाहनांची शिपमेंट वार्षिक 12 टक्के वाढून 3,76,679 झाली आहे, जे आर्थिक वर्ष 2024 च्या सप्टेंबर तिमाहीत 3,36,754 होते.

ह्युंडाईची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी

एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत ह्युंडाई मोटार इंडियाची एकूण निर्यात 84,900 होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 टक्के कमी आहे. एप्रिल-सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने 86,105 वाहनांची निर्यात केली.

स्कूटरची निर्यात 19 टक्के वाढली

एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत स्कूटरची निर्यात 19 टक्केने वाढून 3,14,533 वर पोहोचली आहे. तर मोटारसायकल निर्यात 16 टक्के वाढून 16,41,804 वर पोहोचली आहे. या कालावधीत व्यावसायिक वाहनांची निर्यातही 35,731 झाली.

त्यातही वार्षिक आधारावर 12 टक्के वाढ झाली

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण निर्यात 5.5 टक्के नी घसरली. जगभरात चालू असलेल्या संघर्ष आणि आर्थिक संकटामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ऑटो निर्यात 5.5 टक्केने कमी झाली. या कालावधीत भारतातून एकूण 45,00,492 वाहने जागतिक बाजारपेठेत पाठवण्यात आली.

2022-23 या आर्थिक वर्षात ही संख्या 47,61,299

चलनाच्या अवमूल्यनामुळे निर्यात कमी झाली. निर्यातीतील या वाढीबाबत सियामचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले की, अमेरिका आणि आफ्रिकेसारख्या प्रमुख बाजारपेठा, ज्या विविध कारणांमुळे मंदावल्या होत्या, परत आल्या आहेत. ते म्हणाले की चलन अवमूल्यनामुळे आफ्रिकन देशांसह इतर अनेक देश केवळ जीवनावश्यक वस्तू आयात करत आहेत.

Advertisement
Tags :

.