महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचे 14 आमदार संपर्कात : बीजद

06:20 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ओडिशातील राजकीय घडामोडींना वेग : भाजपने फेटाळला दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

ओडिशात बिजू जनता दल लवकरच स्वत:चे सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी बीजदमधून बाहेर पडत 22 नेते भाजपमध्ये सामील झाले होते. हे नेते सध्या आमदार आहेत. यातील 14 आमदार आता बीजदच्या संपर्कात आहेत. अशा स्थितीत आमच्या पक्षाच्या सत्तेतील पुनरागमनाचा मार्ग ख्gला होत असल्याचा दावा बीजदचे राज्यसभा खासदार मुन्ना खां यांनी केला आहे.

अद्याप 90 टक्के तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदांची सत्ता बीजदकडे आहे. जर आता निवडणूक झाली तर आम्ही 100 जागा जिंकू असे मुन्ना खां यांनी म्हटले आहे. बीजदच्या राज्यसभा खासदाराच्या या दाव्यानंतर भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.  14 आमदार जर पक्ष सोडून गेले तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे भाजपचे वरिष्ठ आमदार जयनारायण मिश्र यांनी सुनावले आहे.

2029 पर्यंत बीजदचे अस्तित्व टिकण्याबद्दलच मला संशय आहे. बीजदचा प्रत्येक नेता स्वत:च्या भवितव्यावरून चिंतेत आहे. बीजदचे अनेक नेते आमच्या पक्षाच्या देखील संपर्कात आहेत. बीजदमध्ये नेतृत्वाचे संकट आहे. पक्षाचे नेतृत्व कोण करणार यावरून बीजदचे अनेक नेते अस्वस्थ असल्याचा दावा भाजप आमदाराने केला आहे.

ओडिशा विधानसभेत एकूण 147 आमदार असून सरकार स्थापन करण्यासाठी 74 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सद्यकाळात भाजपकडे 78 आमदार आहेत. तर बीजदकडे 51 आणि काँग्रेसकडे 14 आमदार आहेत. तर भाकपचा 1 आणि 3 अपक्ष आमदार आहेत.

बीजदच्या माजी आमदाराचा राजीनामा

जाजपूर जिल्ह्dयाच्या बरी मतदारसंघातील बीजदच्या माजी आमदार सुनंदा दास यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी स्वत:चा राजीनामा पक्षाचे सर्वेसर्वा नवीन पटनायक यांना पाठविला आहे. मागील 5 महिन्यांपासून पक्षाकडून माझ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुनंदा दास या 2019-24 पर्यंत आमदार होत्या. 2024 च्या निवडणुकीत बीजदने त्यांना उमेदवारी नाकारली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article