For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत सौदीमध्ये 14 ठार

06:45 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
हेलिकॉप्टर दुर्घटनेत सौदीमध्ये 14 ठार
Advertisement

हेलिकॉप्टर ‘अरामको’ तेल कंपनीचे : सर्व मृत सौदी अरेबियन नागरिक

Advertisement

वृत्तसंस्था/ रियाध

जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अरामकोचे एक हेलिकॉप्टर रविवारी सौदी अरेबियातील रास तानुरा येथे कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 14 जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सौदी नागरिक होते. तथापि, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Advertisement

हा अपघात रास तानुरा परिसरात झाला. सौदी ऊर्जा मंत्रालयाने या अपघाताची माहिती दिली. त्यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये ‘सौदी अरामको’चे एक हेलिकॉप्टर कोसळले असून त्यातील सर्व 14 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.  सरकारी माध्यमांनुसार, हा अपघात रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला.  सौदी सरकारने अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी संबंधित संस्थांच्या सहकार्याने तपास सुरू करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक आहे. ती सौदी अरेबिया सरकारच्या मालकीची आहे. अमेरिकन कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार 1933 मध्ये तिची स्थापना झाली. 1980 मध्ये, ती पूर्णपणे सौदी सरकारच्या नियंत्रणाखाली आली. कंपनीचे मुख्यालय धाहरान येथे आहे. अरामके जगातील सर्वात मोठ्या तेलसाठ्यांपैकी एक असून ती दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करते, साहजिकच ही कंपनी जागतिक ऊर्जा बाजारासाठी एक प्रमुख पुरवठादार बनली आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर या कंपनीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अरामको केवळ कच्च्या तेलाचे उत्पादनच करत नाही, तर ती शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स आणि नैसर्गिक वायूमध्येही गुंतलेली आहे.

Advertisement
Tags :

.