महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जखमी

11:45 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमननगर-उज्ज्वलनगर परिसरात घटना

Advertisement

बेळगाव : अमननगर, उज्ज्वलनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जण जखमी झाले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कुत्र्याचा बंदोबस्त करावा, यासाठी अमननगर परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे धाव घेतली. शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर त्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने मनपाचे पथक दाखल झाले. त्यानंतर त्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पिसाळलेल्या एका कुत्र्याने हल्ला केला असला तरी अनेक कुत्री त्या ठिकाणी कळप करून ठाण मांडून आहेत. ती कुत्री अचानकपणे हल्ला करत आहेत. शुक्रवारी सकाळी त्या कुत्र्याने अचानकपणे हल्ला केला. जवळपास 14 जणांचा चावा घेतला. त्यानंतर काही तरुणांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुत्रे सापडले नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. महानगरपालिकेचे पथक सकाळी दाखल झाले. दोन कुत्री पकडली. मात्र पिसाळलेले कुत्रे सापडले नाही. त्यामुळे ते पथक माघारी फिरले. पुन्हा ते पिसाळलेले कुत्रे दुपारी या परिसरात आढळून आले. त्यामुळे महानगरपालिकेकडेच तेथील नागरिकांनी धाव घेतली. त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी तातडीने एक पथक पाठवून दिले. याचबरोबर स्थानिक तरुणांनीही त्या पथकाला मदत केली. रात्री उशिरापर्यंत कुत्रा पकडण्यासाठी धडपड सुरू होती. कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मुलांवर, तसेच नागरिकांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

Advertisement

कुत्र्यांचा कळप ठाण मांडून...

शुक्रवारी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला तरी अनेक कुत्र्यांचा कळप त्या ठिकाणी कायम राहतो. अचानकपणे ही कुत्री लहान मुलांवर हल्ला करत आहेत. महिलांवरही अनेकवेळा हल्ले झाले आहेत. तेव्हा या कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article