For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल-कायदाच्या 14 दहशतवाद्यांना अटक

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल कायदाच्या 14 दहशतवाद्यांना अटक
Advertisement

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश : अल कायदा प्रभावित मॉड्यूलचा पर्दाफाश : संशयितांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके जप्त

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश  पोलिसांसह पाकिस्तानी दहशतवादी संघटना अल कायदाच्या 14 दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे सर्व अल कायदा प्रेरित मॉड्यूलचे सदस्य आहेत. या मॉड्यूलचे नेतृत्व रांची येथील डॉ. इश्तियाक करत होते. त्याला खिलाफत घोषित करून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी संघटना स्थापन करायची होती. या मॉड्यूलच्या सदस्यांना विविध ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Advertisement

अतिरिक्त पोलीस आयुक्त स्पेशल सेल प्रमोद सिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सेलने राजस्थान पोलिसांच्या मदतीने भिवडी येथून शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच झारखंड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने दोन्ही ठिकाणांहून आठ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

व्यापक कारवाईची शक्मयता

वेगवेगळ्या राज्यात अजूनही कारवाया सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आणखी दहशतवाद्यांना अटक होण्याची शक्मयता आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा आणि इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. आतापर्यंत रांचीमध्ये 15, राजस्थानमध्ये एक आणि अलीगढमध्ये एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

सदर दहशतवादी मॉड्यूल देशात अनेक दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखत होते. या हल्ल्यांसाठी मॉड्यूलच्या सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. शस्त्रे वापरण्याच्या प्रशिक्षणादरम्यान पोलिसांनी राजस्थानमधील भिवडीसह झारखंड आणि उत्तर प्रदेशात मोठी कारवाई करत 14 संशयितांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली असून देशातील दहशतवादी कारवाया रोखण्यात त्यांना यश आले आहे.

Advertisement
Tags :

.