For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धोकादायक! जगभरातल्या ३९० प्रदूषित शहरांमध्ये भारतातल्या १३८ शहरांचा समावेश

03:50 PM May 18, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
धोकादायक  जगभरातल्या ३९० प्रदूषित शहरांमध्ये भारतातल्या १३८ शहरांचा समावेश
Air Pollution in India
Advertisement

Most Poluted Cities जगभरात सध्या प्रदूषणाचा आलेख वाढत असताना हवेत धोकादायक वायूंचं वाढतं प्रमाण चिंतेंचं कारण बनलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये जगभरातल्या ३९० सर्वातं प्रदूषित आणि श्रीमंत शहरामंध्ये आता भारतातील १३८ शहरांचा समावेश झाला आहे.

Advertisement

नेचर सिटीज'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातली आकडेवारी चिंताजनक आहे, भारतीय शहरांची वाढ ही जीवाश्म इंधनाच्या वापराशी आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाशी निगडित आहे. नेचर सिटीजच्या अभ्यासानुसार चीन आणि इतर अनेक देशांनी स्वच्छ शहरीकरणात आघाडी घेतली आहे. संशोधकांनी उपग्रहावर आधारित नायट्रोजन डायऑक्साइड डेटा आणि जीडीपी अंदाजांचा वापर करून २०१९ ते २०२४ दरम्यान जगभरातील ५,४३५ शहरांचा अभ्यास  केला.

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील अहवाल

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, जागतिक स्तरावर अधिक प्रदूषित आणि अधिक समृद्ध म्हणून वर्गीकृत केलेल्या ३९० शहरांमध्ये आर्थिक वाढीबरोबर प्रदूषणही वाढले, त्यापैकी १३८ शहरे, म्हणजेच सुमारे ३५.४%, भारतात होती.

Advertisement

या अभ्यासात असे म्हटले आहे की, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांनी स्वच्छ विकासाचा कल दर्शवला असला तरी, भारतातील अनेक शहरी केंद्रे अजूनही जीवाश्म इंधनावर आधारित वाहतूक, उद्योग आणि वीज निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.

भारतातील ५ सर्वात श्रीमंत शहरे

हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ नुसार, ९१ अब्जाधीशांसह मुंबई हे सर्वात श्रीमंत लोकांचे पसंतीचे शहर आहे. दिल्ली-एनसीआर: अंदाजे ₹२६.३३ लाख कोटींच्या जीडीपीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाता हे पूर्व भारतातील सर्वात मोठे औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र आहे. बंगळूर (कर्नाटक) ला 'भारताची सिलिकॉन व्हॅली' म्हटले जाते.

अंदाजे ₹९.८६ लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेसह, हे देशाची आयटी आणि स्टार्टअप राजधानी आहे. चेन्नई (तामिळनाडू) 'भारताची ऑटो राजधानी' म्हणून ओळखले जाते. अंदाजे ₹७.०५ लाख कोटींच्या जीडीपीसह, या शहरात देशातील प्रमुख ऑटोमोबाईल कारखाने, आयटी आणि आरोग्यसेवा क्षेत्रे आहेत.

Advertisement
Tags :

.