For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1,35,000 जणांना मिळणार चालू आर्थिक वर्षात नोकरी

06:56 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
1 35 000 जणांना मिळणार चालू आर्थिक वर्षात नोकरी
Advertisement

आयटी क्षेत्रातचे आगामी चित्र: नॅसकॉमकडून माहिती सादर

Advertisement

मुंबई :

कृत्रीम बुद्धिमत्तेच्या (एआय) बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास साधला जात असताना चालू आर्थिक वर्षामध्ये सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात 1,35,000 जणांना आयटी क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सदरची माहिती उद्योग मंडळ नॅसकॉम यांनी दिली आहे.

Advertisement

चालू आर्थिक वर्षात मार्च 2026 पर्यंत 1,35,000 जणांना आयटी क्षेत्रामध्ये नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. मागच्या वर्षी 1,33,000 जणांना नोकरीत सामावून घेण्यात आले होते. नॅसकॉमचे अध्यक्ष राजेश नंबीयार यांनी यासंदर्भातील माहिती दिली. जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) यांची भारतामध्ये वेगाने उभारणीसह वाढ होत असून नोकरी देण्यामध्ये यांचा वाटा अधिक राहणार आहे. एआयचा सॉफ्टवेअर सेवा उद्योगावर परिणाम होणार असल्याच्या नकारात्मक बातमीचे पडसाद या क्षेत्रातील कंपन्यांवर गेल्या काही दिवसात पहायला मिळाले आहेत. भारतीय शेअर बाजारामध्ये आयटी कंपन्यांच्या समभागांची घसरण सातत्याने सुरु आहे. असे असतानाही चालू आर्थिक वर्षामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक उमेदवारांची भरती करुन घेतली जाणार असल्याचे नंबीयार यांनी म्हटले आहे.

एकंदरीत कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून नोकर भरतीचे प्रमाण कमी झाले आहे. अधिकाधिक उमेदवारांना कौशल्य व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचे कार्यही जोमाने सुरु आहे.

Advertisement
Tags :

.