महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोलवाळ तुरुंगात 132 कैदी

12:01 PM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : कोलवाळ मध्यवर्ती तुऊंगात वर्षभरात एकूण 132 कैदी शिक्षा भोगत आहेत. 31 डिसेंबर 2022 पर्यंत शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची संख्या 109 इतकी होती. 2023 सालामध्ये त्यात 23 दोषी ठरलेल्यांची भर पडली आहे. तर 91 कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षा भोगत असलेले 16 कैदी मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.मध्ये खून केल्यामुळे 43 कैदी शिक्षा भोगत आहेत, तसेच ड्रग्ज तस्करीत सहभागी 25 कैदी, बलात्कार केल्यामुळे 16 कैदी, प्राणघातक हल्ला केल्यामुळे 6 कैदी, सदोष मनुष्यवधामुळे 4 कैदी, अपहरण प्रकरणात 2, महिलांचा छळ किंवा विनयभंग केल्यामुळे 2 कैदी शिक्षा भोगत आहेत. तसेच 6 कैदी जबरी चोरी किंवा इतर गुन्हेगारी प्रकार केल्यामुळे शिक्षा भोगत असून, फसवणूक केल्यामुळे 3 कैदी शिक्षा भोगत आहेत. पुन्हा गुन्हा केल्यामुळे 3 कैद्यांना शिक्षा भोगावी लागली आहे.

Advertisement

खून, बलात्कार, अपहरण, प्राणघातक हल्ला, अमलीपदार्थ तस्करी, मारहाण व इतर गुन्हेगारी कारवाया केल्याबद्दल 31 डिसेंबर 2022 पर्यंत 109 जण शिक्षा भोगत होते. त्यांतील 44.95 टक्के म्हणजे 49 कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. तर 109 पैकी 39.44 टक्के म्हणजे 43 कैदी खुनी असल्याचा अहवाल राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाकडून (एनसीआरबी) जारी करण्यात आला आहे.राज्यात भारतीय दंड संहितेच्या खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, फसवणूक, आर्थिक गुन्हे तर विशेष कायदा किंवा स्थानिक कायद्यांतर्गत जसे अमली पदार्थ तस्करी, माहिती व तंत्रज्ञान कायदा, सायबर व मोटार अपघात कायद्यांतर्गत गुह्यांत समावेश सिद्ध झाल्यामुळे 109 जणांना राज्यातील विविध न्यायालयांनी शिक्षा ठोठावली होती. त्यांत 103 पुऊष, तर 6 महिलांचा समावेश होता. तसेच त्यामध्ये 99 देशी तर 10 विदेशी नागरिक आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article