केरळमध्ये 13 वर्षीय मुलीचे शाळेतच लैंगिक शोषण
वर्गात शिकणाऱ्या मुलांवर आरोप : चौकशी सुरू
वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम
केरळमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीचे तिच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलांनी लैंगिक शोषण केले आहे. मागील दोन महिन्यांपासून शाळेतील स्वच्छतागृहृ वर्ग आणि एका विद्यार्थिनीच्या घरात लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी 6 आरोपी अल्पवयीन असून यात एका मुलीचाही समावेश आहे.
शाळेतील समुपदेशनादरम्यान मुलीने स्वत:वरील अत्याचारांची माहिती दिली होती. यानंतर त्वरित याप्रकरणाची माहिती चाइल्ड हेल्पलाइन अधिकाऱ्यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संभाषण करत पोलिसांना या प्रक्रियेत सामील पेले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेत चौकशी सुरू केली आहे. पीडितेच्या क्लासमेट्सनी विविध ठिकाणी तिचे लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्वांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.