For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलगावची १३ वर्षाची गार्गी सावंत बनली पखवाज विशारद

03:30 PM May 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कोलगावची १३ वर्षाची गार्गी सावंत बनली पखवाज विशारद
Advertisement

रामटेक येथील नामांकित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठाची पदवी

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
सावंतवाडी येथील शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या अवघ्या १३ वर्षाच्या कु. गार्गी किरण सावंत हिने रामटेक येथील नामांकित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठाची 'पखवाज विशारद' पदवी संपादन केली आहे. गार्गी सावंत हिला पखवाज अलंकार महेश सावंत मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उत्कृष्ट दिशादर्शनामुळे आणि कौशल्याने शिकवलेल्या तालाच्या धड्यांमुळेच गार्गी पखवाज वादनातील कठीण आकृतीबंध अगदी सहजतेने आत्मसात करू शकली.गार्गी सावंतने दोन वर्षांपूर्वी अवघ्या ११ व्या वर्षी'भारतीय संगीत कला पिठ 'ची विशारद पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर तिचे गुरु पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपला सराव अधिक दृढ करत वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कविगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे 'पखवाज विशारद प्रमाणपत्र मिळवले आहे. आपली महत्त्वाची केली. भारतीय संगीत कला पिठ च्या संभाजीनगर या केंद्रातून तिने हे यश संपादन केले आहे.शाळेचा अभ्यास सांभाळून पखवाज सारख्या जड पारंपारिक वाद्यावर तालाची अचूक पकड मिळवत संगीत क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. त्यामुळे संगीत क्षेत्रातील या यशाबद्दल गार्गी सावंत हिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. कु. गार्गी सावंत ही कोलगाव येथील माजी सैनिक तथा वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किरण सावंत यांची कन्या आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.