महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आखातात पीएफआयचे 13 हजार सक्रीय सदस्य

06:09 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ईडीचा दावा : कोट्यावधींचा निधी उभारण्याचे टार्गेट, रक्कम हवालाद्वारे भारतातील दहशतवाद्यांपर्यंत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतातील प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विऊद्ध ईडीच्या दोन वर्षांच्या तपासात नवे खुलासे समोर आले आहेत. पीएफआयचे सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये 13 हजारांहून अधिक सक्रीय सदस्य असून त्यांच्याकडे करोडो ऊपयांचा निधी उभारण्याची जबाबदारी असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. पीएफआयने आखाती देशांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरित मुस्लीम समुदायासाठी जिल्हा कार्यकारी समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांना निधी उभारणीची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही उघड झाले आहे.

परदेशात जमा केलेला करोडो ऊपयांचा निधी वेगवेगळ्या बँकिंग चॅनेलद्वारे तसेच हवालाद्वारे भारतात पाठविण्यात आला होता. हा निधी भारतात पोहोचल्यानंतर त्याचा वापर पीएफआयने दहशतवादी कृत्यांसाठी वापरला. सप्टेंबर 2022 मध्ये ईडी आणि एनआयएने देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये पीएफआयशी संबंधित अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. छापेमारीनंतर केंद्र सरकारने 28 सप्टेंबर 2022 रोजी पीएफआय संस्थेवर बंदी घातली होती. तेव्हापासून ईडी पीएफआयविरोधात चौकशी करत आहे.

2006 मध्ये पॉप्युलर फ्रंट इंडियाची स्थापना केली. ही संघटना सुऊवातीला फक्त दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सक्रीय होती. परंतु आता त्याचे जाळे उत्तर प्रदेश-बिहारसह 23 राज्यांमध्ये पसरल्याचे दिसून आले आहे. पीएफआय एक सामाजिक चळवळ म्हणून स्वत:ला सादर करते, परंतु पीएफआयचे खरे उद्दिष्ट जिहादच्या माध्यमातून भारतात इस्लामिक चळवळ निर्माण करणे हे असल्याचे तपासात समोर आले आहे. पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित संघटना बेकायदेशीर कारवाया करत होत्या. या कारवाया देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका आहे. त्यांच्या कारवाया देशाच्या शांतता आणि धार्मिक सौहार्दालाही धोका निर्माण करू शकतात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article