For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हॅन-ट्रेलर धडकेत 13 जण जिवंत जळाले

07:00 AM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हॅन ट्रेलर धडकेत 13 जण जिवंत जळाले
Advertisement

चीनमधील द्रुतगती मार्गावर भीषण दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/बीजिंग

मध्य चीनच्या हेनान प्रांतात गुरुवारी सकाळी एक मोठा रस्ते अपघात झाला. द्रुतगती मार्गावर एका प्रवासी व्हॅनची सेमी-ट्रेलर ट्रकला धडक बसल्याने 13 जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य तीन जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे 2:40 च्या सुमारास नानयांग शहरातील द्रुतगती मार्गाच्या भागावर घडला. अपघातप्रसंगी प्रवासी व्हॅनमधून 16 लोक प्रवास करत होते. या भीषण दुर्घटनेनंतर सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने तपास आणि बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी नानयांग येथे एक पथक पाठवले आहे. या अपघातापूर्वीच अलीकडेच चीनमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली होती उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळसा खाणीतील अपघातात आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.