13 आयपीओ येणार, 8 कंपन्यांचे समभाग सूचीबद्ध होणार
बजाज फायनान्स, टोलीन्स टायर्सचा समावेश : 8644 कोटी रुपये उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात 13 आयपीओ येणार असून त्यामध्ये चार मोठ्या कंपन्यांचे आहेत आणि बाकी छोट्या कंपन्यांचे आयपीओ आहेत. सर्व कंपन्या मिळून आयपीओच्या माध्यमातून 8644 कोटी रुपये उभारणार आहेत.
ऑगस्ट महिन्यामध्ये एकंदर 17000 कोटी रुपयांची रक्कम आयपीओतून उभारली गेली आहे. मे 2022 नंतर पाहता एकाच महिन्यामधून आयपीओच्या मार्फत उभारण्यात आलेली ही मोठी रक्कम असल्याचे सांगितले जाते. महत्त्वाचे म्हणजे ज्या कंपन्यांचे आयपीओ सध्या बाजारात लिस्ट होत आहेत त्यांना लिस्ट झालेल्या पहिल्या दिवशीच उत्तम परतावा मिळत आहे.
सदरच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची झाल्यास किमान 15 हजार रुपयांची गरज लागते. एसएमइ क्षेत्रातील श्री तिरुपती बालाजी, माय मुद्रा यांचे आयपीओ सोमवारी बंद झाले आहेत. यानंतर ट्रॅफिकसोल, एसपीपी पॉलिमर यांचेही समभाग लिस्ट होणार आहेत.
मोठ्या कंपन्यांच्या आयपीओमध्ये पाहता पी एन गाडगीळ, बजाज हाऊसिंग फायनान्स, टोलिन्स टायर्स आणि क्रोस यांचा समावेश असणार आहे.
हे आयपीओ होणार सादर
? बजाज हाऊसिंग फायनान्स
? टोलीन्स टायर्स
? क्रोस
? पी एन गाडगीळ ज्वेलर्स
? अर्केड डेव्हलपर्स
? गजानंद इंटरनॅशनल
? शेअर समाधान
? शुभश्री बायोफ्युल्स एनर्जी
? आदित्य अल्ट्रा स्टील
? ट्रॅफिकसोल आयटीएस टेक्नॉलॉजीस
? एसपीपी पॉलीमर्स
? इनोमेट अॅडव्हान्सड मटेरियल्स
? एक्सलन्स वायर्स अँड पॅकेजिंग
? हे समभाग होणार सुचीबद्ध
? गाला प्रीसिजन इंजिनियरिंग
? श्री तिरुपती बालाजी
? जेयाम ग्लोबल फुडस्
? नेचरविंग्ज होल्डींग्ज
? नमो इ वेस्ट मॅनेजमेंट
? मॅक कॉन्फरन्स अँड इव्हेंटस्
? मायमुद्रा फिनकॉर्प
? विजन इन्फ्रा इक्वीपमेंट सोल्युशन्स