बिबट्याच्या हल्ल्यात 13 शेळ्या ठार
उंडाळे :
बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये कराड परिसरासह तालुक्यातील अनेक गावात वाढ होत आहे. घोगाव (ता. कराड) येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बिबट्याने शेतात बसवलेल्या शेळ्या मेंढ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक दोन नव्हे तर तब्बल 13 शेळ्या आणि मेंढ्या ठार झाल्या असून शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
कराडलगत मानवी वस्तीत बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केल्याच्या घटना आहेत. बिबट्याच्या मानवी वस्तीतील वावरामुळे पहाटे किंवा सायंकाळी बाहेर पडणाऱ्यांच्यात भितीचे वातावरण आहे. दरम्यान, घोगाव विकास सेवा सोसायटीचे सचिव सुभाष बापूराव पाटील यांच्या मळी शिवारातील शेतात दत्तात्रय निवृत्ती काकडे व निशिकांत अशोक चव्हाण यांच्या शेळ्या मेंढ्या बसवण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी साडे पाच वाजता चव्हाण आणि काकडे आपले मेंढ्या घेऊन चारण्यासाठी घेऊन बाहेर गेले होते. तत्पूर्वी या शेळ्या मेंढ्यांची लहान पिले ज्या शेतात मेंढरे बसवली जातात. तिथेच सुरक्षित जागी जाळीत झाकून ठेवली होती याचं लहान झाकून ठेवलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या पिलावर सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास बिबट्याने हला केला. या हल्यात 13 शेळ्या मेंढ्या ठार झाल्या. बिबट्याने बंदिस्त जाळीतील शेळ्या मेंढ्या कोणी नसल्याचा फायदा घेत जाळीत घुसून शेळ्या मेंढ्यावर हला केला.