For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यामध्ये 13 टक्के घसरण

06:40 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यामध्ये 13 टक्के घसरण
Advertisement

चौथ्या तिमाहीत 16971 कोटींचा नफा, उत्पन्नात 13 टक्के वाढ

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बाजारभांडवल मूल्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून एकत्रित निव्वळ नफ्यामध्ये वर्षाच्या आधारावर 13 टक्के घसरण झाली आहे. याचप्रमाणे उत्पन्न मात्र 13 टक्के वाढले आहे.

Advertisement

चौथ्या तिमाहीत कंपनीने 16971 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये 19407 कोटी रुपये नफा प्राप्त करण्यात आला होता. व्यवसाय स्तरावर कंपनीची कामगिरी सदरच्या तिमाहीत चांगली झाली आहे. यातूनच कंपनीचे उत्पन्न 13 टक्के वाढत 2.98 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याच दरम्यान कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2026 साठी 6 रुपये प्रतिसमभाग लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. जागतिक देशांमधला तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये होणारा चढ-उतार यामुळे कंपनीच्या कामगिरीवर परिणाम दिसून आला. या कारणामुळे जगभरातील कंपनीच्या व्यवहारांवर प्रभाव पडलेला दिसला.

जिओची दमदार कामगिरी

याच दरम्यान रिलायन्स जिओने सदरच्या तिमाहीत वर्षाच्या आधारावर महसुलामध्ये 13 टक्के वाढ नोंदविली आहे. 44928 कोटी रुपयांचा महसूल जिओने चौथ्या तिमाहीत कमविला आहे. या कंपनीचा नफा 13 टक्के वाढीसोबत 7935 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याच सोबत रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांची संख्या समाधानकारक वाढलेली आहे. सदरच्या तिमाहीत अंदाजे 91 लाख इतके नवे वापरकर्ते जोडले गेले आहेत.

Advertisement
Tags :

.