For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज बारावीचा निकाल

07:59 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आज बारावीचा निकाल
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

गेल्या 28 फेब्रुवारी ते 18 मार्च  या कालावधीत घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज रविवार दि. 21 रोजी संध्याकाळी 5 वाजता शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्यो जाहीर करतील.

या वर्षी 20 केंद्रांमध्ये एकूण 17 हजार 987 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 8 हजार 550 मुले तर 9 हजार 437 मुलींचा समावेश आहे. यात कला विभागात 1 हजार 379 मुले आणि 2 हजार 930 मुली मिळून 4 हजार 309 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  वाणिज्य विभागात 2 हजार 841 मुले आणि 2 हजार 479 मुली अशा एकूण 5 हजार 320 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विज्ञान विभागात 2 हजार 616 मुले आणि 3 हजार 267 मुली मिळून 5 हजार 883 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. व्यावसायिक शाखेत 1 हजार 714 मुले आणि 761 मुली मिळून 2 हजार 475 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षी 19 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा  दिली होती. त्यात 18 हजार 479 विद्यार्थी पास झाले होते व एकूण 95.46 टक्के निकाल लागला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.