For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावीचा निकाल 85 टक्के, मुलींची बाजी

10:55 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बारावीचा निकाल 85 टक्के  मुलींची बाजी
Advertisement

एकूण 17,511 विद्यार्थ्यांपैकी 14,884 उत्तीर्ण : कला :86.33, वाणिज्य : 90.78 : विज्ञान 82.41,183 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 165 जण उत्तीर्ण

Advertisement

पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 या दरम्यान घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेचा निकाल 84.99 टक्के लागला. परीक्षेला 17511 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 14884 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांनी दिली. यावेळी सचिव विद्यादत्त नाईक व भारत चोपडे उपस्थित होते. बारावी परीक्षेला 17511 विद्यार्थ्यांपैकी 8276 मुले तर 9235 मुली परीक्षेला बसल्या होत्या. पास झालेल्या मुलींची टक्केवारी 88.06 असून, ती मुलांच्या टक्केवारीहून अधिक आहे. 81.59 टक्के मुले पास झाले आहेत. या परीक्षेला एकूण 106 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतून विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या 106 शाळांपैकी 92 अनुदानित, 9 सरकारी, तर 5 विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. बार्देश तालुक्याचा टक्केवारीत अव्वल क्रमांक लागला असून, धारबांदोडा तालुक्याने सर्वाधिक कमी टक्केवारी प्राप्त केली आहे.

दिव्यांगांचा निकाल 90. 06 टक्के

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात निकालाच्या टक्केवारीमध्ये मुलींच अव्वल ठरत आहेत. यंदाही राज्यातील 20 केंद्रामधून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलींनी आपली टक्केवारी अव्वल असल्याचे दाखवून दिले आहे. राज्यातील 32 उच्च माध्यमिक शाळांमधून 183 दिव्यांग विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 165 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची 90.06 टक्केवारी आहे.

क्रीडागुणांमुळे 2 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

यंदाच्या परीक्षेत क्रीडा गुणांचा लाभ घेण्यासाठी 2 हजार 980 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी 180 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी 2.26 टक्के इतकी आहे. एनएसक्यूएफ विषयातील 1051 विद्यार्थ्यांपैकी 853 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी 81.16 टक्के आहे. सामाजिक श्रेणीनिहाय निकालाचा आढावा घेतला असता एससी (अनुसूचित जाती) विद्यार्थ्यांनी टक्केवारीत बाजी मारली आहे. 382 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 331 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 51 विद्यार्थ्यांना सुधारणा गरजेची आहे. एससी विद्यार्थ्यांनी 86.65 इतकी टक्केवारी प्राप्त केली आहे. खुल्या प्रवर्गातून 12 हजार 32 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 हजार 269 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले, तर 1763 विद्यार्थ्यांना सुधारणा गरजेची आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल 85.35 टक्के लागला असून, तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ओबीसी वर्गातील 3 हजार 136 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2 हजार 647 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, 489 विद्यार्थ्यांना सुधारणा गरजेची असल्याचा शेरा मारला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची 84.41 इतकी टक्केवारी आहे. एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील 1 हजार 961 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 हजार 637 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 324 विद्यार्थ्यांना सुधारणा गरजेची आहे. या गटातील विद्यार्थ्यांचा निकाल 83.48 टक्के लागला आहे.

शाखानिहाय निकाल असा :

  • कला शाखेतून 4 हजार 156 विद्यार्थी परीक्षेल बसले होते. त्यापैकी 3 हजार 588 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 86.33 टक्के.
  • वाणिज्य शाखेतून 5 हजार 194 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 90.78 टक्के.
  • विज्ञान शाखेतून 5 हजार 736 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 4 हजार 727 विद्यार्थी उत्तीर्ण. 82.41 टक्के निकाल.
  • व्यावसायिक शाखेतून 2 हजार 425 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 1 हजार 854 विद्यार्थी पास. एकूण निकाल 76.45 टक्के.

तालुकानिहाय निकाल असा :

  • बार्देश : 2990 विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी 2718 विद्यार्थी उत्तीर्ण. एकूण निकाल 90.90 टक्के
  • डिचोली : 1244 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 1091 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 87.70 टक्के.
  • काणकोण : 556 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 477 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 85.79 टक्के.
  • केपे : 1191 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 976 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 81.19 टक्के.
  • मुरगाव : 1364 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 1142 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 83.72 टक्के.
  • पेडणे : 704 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 571 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 81.11 टक्के.
  • फोंडा : 2219 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 1738 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 78.32 टक्के.
  • सासष्टी : 3879 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 3417 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 88.09 टक्के.
  • सांगे : 146 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 131 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 89.73 टक्के निकाल.
  • सत्तरी : 769 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 508 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 66.06 टक्के निकाल.
  • तिसवाडी : 2263 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 2006 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 88.64.
  • धारबांदोडा : 186 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 63.44 टक्के.

गोवा बोर्डाचा भोंगळ कारभार

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल रविवारी संध्याकाळी पाच वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्याची वेळ ठरवली होती. परंतु संध्याकाळी पाच वाजता निकाल जाहीर झालाच नाही. ऐनवेळी टेक्निकल अडचण झाल्याचे स्पष्टीकरण देऊन रात्री 8 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे ऐनवेळी सांगण्यात आले. यामुळे पालक, विद्यार्थी, त्यांचे नातेवाईक यांना निकाल जाहीर होण्यास नेमका का उशीर लागला हे कळायला मार्ग नाही. जर यंत्रणेत बिघाड होता, तर यंत्रणेची चाचणी पूर्वीच घ्यायला हवी होती. निकाल पूर्णपणे तयार झाल्यानंतरच त्याच्या जाहीर करण्याची वेळ निश्चित करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पत्रकारांनाही पणजी ते पर्वरी असा दोन वेळा निकालासाठी प्रवास करावा लागला.

Advertisement
Tags :

.