For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावीचा निकाल उद्या

12:53 PM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
बारावीचा निकाल उद्या
Advertisement

पोटनिवडणुकींमुळे निकालाला विलंब

Advertisement

बेळगाव : पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल 7 एप्रिल रोजी जाहीर केला जाणार असल्याचे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले होते. परंतु कर्नाटकातील विधानसभा पोटनिवडणुकांमुळे निकालाला विलंब होत आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागातील काही कर्मचारी निवडणुकांच्या कामात गुंतल्याने निकालावर परिणाम झाला. त्यामुळे गुरुवार दि. 9 रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात बागलकोट व दावणगेरे येथे पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या कामामध्ये पदवीपूर्व शिक्षण विभागातील काही कर्मचारी जुंपण्यात आल्या आहेत. त्यामुळेच शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा निवडणुकानंतर बारावीचा निकाल देणार होते. परंतु निकालासाठी विलंब झाल्यास पुढील परीक्षांचे वेळापत्रक ढेपाळणार असल्याने निकालाची तारीख निश्चित करण्यात आली. निकालाबाबत अद्याप काही तांत्रिक बाबी पूर्ण होणे गरजेचे असल्याने तो पुढे ढकलण्यात आला. गुरुवार दि. 9 रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे शालेय शिक्षण व मूल्यमापन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. परंतु वेळेबाबत अद्याप निश्चिती देण्यात आली नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.