For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावीच्या दुसऱ्या परीक्षेला कन्नड विषयाने प्रारंभ

11:16 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बारावीच्या दुसऱ्या परीक्षेला कन्नड विषयाने प्रारंभ
Advertisement

बेळगाव : बारावी मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व शिक्षण विभागाने दुसरी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेला सोमवार दि. 29 पासून प्रारंभ झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 11 परीक्षा केंद्रांवर कन्नड विषयाचा पहिला पेपर घेण्यात आला. सकाळी 10.15 ते दुपारी 1.30 यावेळेत पेपर झाला. कन्नड पेपरला 989 परीक्षार्थींनी अर्ज केले होते. त्यापैकी 851 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. 138 विद्यार्थ्यांनी परीक्षेला पहिल्याच दिवशी दांडी मारली. बेळगाव शहरातील लिंगराज कॉलेज, आरएलएस कॉलेज, सरदार्स कॉलेज, ज्योती कॉलेज, मराठा मंडळ कॉलेज या परीक्षा केंद्रांवर बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. सकाळी 9.30 पासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. बारावी मुख्य परीक्षेप्रमाणेच पुरवणी परीक्षेवेळी सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. तसेच परीक्षेदरम्यान कोठेही कॉपी होणार नाही, यासाठी भरारी पथक व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कन्नड विषयाचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची संख्या अत्यल्प होती.

Advertisement

कॉपीला आळा घालण्यासाठी प्रयत्न...

मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोमवार दि. 29 पासून बारावी पुरवणी परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपीला आळा घालण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गावर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे.

- एम. एम. कांबळे, जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी

Advertisement
Tags :

.