For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुर्कियेत मिळाले 1200 वर्षे जुने थडगे

06:19 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
तुर्कियेत मिळाले 1200 वर्षे जुने थडगे
Advertisement

तुर्कियेच्या इफिससमध्ये पुरातत्वतज्ञांनी 1200 वर्षे जुन्या एका अनोख्या थडग्याचा शोध लावला आहे. हे थडगे आर्टेमिस मंदिरानजीक अत्यंत जुन्या स्वच्छतागृहाखाली मिळाले आहे. या थडग्याला उघडण्यात आल्यावर आतील दृश्य पाहून सर्वजण चकित झाले. यात जुळ्या मुलांचे छोटे सांगाडे होते. ऑस्ट्रियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी या रहस्यमय शोधाविषयी माहिती दिली आहे.

Advertisement

या जुळ्या मुलांपैकी एकाच्या मानेत एक अतिरिक्त हाड मिळाले आहे. या अनोख्या जेनेटिक स्थितीने पूर्ण जगाच्या वैज्ञानिकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. या मुलांना सामान्य दफनभूमीत दफन करण्यात आले नव्हते, थडग्याला अत्यंत सुरक्षेसह तयार करण्यात आले होते. हा शोध ‘चाइल्डहुड इन द पास्ट’ नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. ऑस्ट्रियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधिका कॅरोलिन पार्टियोट यांनी हे थडगे 8 व्या ते 9 व्या शतकामधील असल्याचे सांगितले. थडग्याला रोमन ओडियम नावाच्या बिल्डिंगच्या एका निरुपयोगी ठरलेल्या टॉयलेट चॅनेलमध्ये निर्माण करण्यात आले होते. रोमन ओडियमचा वापर म्युझिकल परफॉर्मेंससाठी केला जात होता. हे आर्टेमिस मंदिराच्या पवित्र भागात होते.

आर्टेमिस मंदिर प्राचीन जगाच्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे. उत्खनन करणाऱ्यांनी दगडाने निर्मित या थडग्याला उघडले असता आत दोन अत्यंत छोटे सांगाडे परस्परांच्या आजूबाजूला ठेवलेले दिसून आले. हाडांच्या आकाराच्या आधारावर संशोधकांनी मोठा अनुमान लावला आहे. ही दोन्ही मुलं स्वत:च्या आईच्या गर्भात सुमारे 7 ते साडे सात महिने राहिले होते. त्यांचा जन्म वेळेपूर्वीच झाला होता.

Advertisement

अतिरिक्त हाडाचे काय रहस्य?

मृत्यूवेळी दोन्ही मुलांचे वय एकसारखे होते, याचमुळे ती जुळी होती असे मानले जात आहे. परंतु भविष्यात डीएनए विश्लेषणाद्वारेच याची पुष्टी होऊ शकेल. संशोधकांना मुलांच्या सांगाड्यावर कुठलीही ईजा किंवा आजाराच्या खुणा मिळालेल्या नाहीत. एका सांगाड्यात सुपरन्यूमेरी सर्वाइकल रिब नावाचे एक दुर्लभ हाड दिसले. हे एक असे जेनेटिक वैशिष्ट्या आहे, ज्यात मानेच्या मागील हिस्स्यात एक अतिरिक्त हाड निर्माण होते असे कॅरोलिन यांनी सांगितले. हे हाडं जवळपास  एक टक्के लोकांमध्ये आढळून येते. सर्वसाधारणपणे या हाडामुळे माणसाला कुठलीच समस्या होत नाही. परंतु मुलांमध्ये याचा संबंध हॉक्स जीनमध्ये होणाऱ्या गडबडीशी असू शकतो. हे जीन भ्रूणाच्या विकासादरम्यान शरीराच्या अवयवांना आकार देते. यात गडबड झाल्याने मुलाचा मृत्यू होऊ शकतो.

जुन्या टॉयलेटनजीक दफन का?

हे दफन अत्यंत अनपेक्षित अन् असाधारण जागी करण्यात ओल होते. यापूर्वी इफिससमध्ये मिळालेली सर्व थडगी प्राचीन मंदिराबाहेर असलेल्या एका खास दफनभूमीत मिळाल्या होत्या असे लिली जब्राना यांनी सांगितले. या मुलांचा वेळेपूर्वीच जन्म झाला होता, बहुधा मृत्यूपर्यंत त्यांचा बाप्तिस्मा झाला नव्हता, म्हणून त्यांना तेथे दफन करण्यात आले असावे असे संशोधकांचे मानणे आहे. परंतु या थडग्याला अत्यंत सुरक्षितपणे दगडांनी तयार करण्यात आले होते. यामुळे  हे एक सन्मानजक दफन होते असे कळते.

संशोधकांचा खुलासा

या शोधादरम्यान संशोधकांना आसपास मुलांच्या मातेचा कुठलाच सुगावा लागलेला नाही. इफिससच्या दफनभूमीत देखील याचा कुठलाच पुरावा मिळालेला नाही. बहुधा मातेचाही त्याचवेळी मृत्यू झाला असावा किंवा माता वाचली असावी. त्या काळात मुलांचा अन् मातांचा मृत्यूदर खूपच अधिक होता. अशास्थितीत ठोस निष्कषापर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड आहे. परंतु परिवाराने मृत्यूनंतर या मुलांची पूर्ण देखभाल केल्याची बाब स्पष्ठ आहे. परिवाराने दगडांनी इतके मजबूत थडगे निर्माण केले की सांगाडे 1200 वर्षांनंतरही सुरक्षित मिळाले आहेत. परिवाराने समाजात या मुलांच्या छोट्याशा उपस्थितीला सन्मान देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता असे कॅरोलिन यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.