पूजा नाईक विरोधात 120 पानी आरोपपत्र
पणजी : गाजलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी संशयित आरोपी पूजा नाईक हिच्या विऊध्द 34 जणांना फसवल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी न्यायालयात 120 पानी आरोपपत्र सादर केले आहे. एकूण आठ कोटी ऊपयांच्या फसवणुकीचा हा आरोप आहे. यापूर्वी 7 प्रकरणात आरोपपत्र सादर झाले असून हे आठवे आरोपपत्र आहे. या खटल्यात अधिकतर साक्षीदार महिलाच असून, यात बहुतांश सूत्रधारही महिलाच असल्याचे उजेडात आले होते. सुमारे 8 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. सरकारी नोकऱ्या देण्यासाठी ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे.
पणजी पोलिसस्थानकात 4, जुने गोवे पोलिसस्थानकात 1, आगशी येथे 3, म्हापसा 1, कोलवाळ 1, पर्वरी 2, डिचोली 6, मडगाव 1, काणकोण 2, वास्को 7, मुरगाव 1, फोंडा 3 तर म्हार्दोळ पोलिसस्थानकात 3 गुन्हे नोंद झाले होते. यापैकी पर्वरी, फोंडा व डिचोलीतील प्रत्येकी एका प्रकरणात आरोपपत्र सादर झाले आहे. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी दोन वर्षात 41 गुन्हे नोंद झाले असून त्यापैकी 7 प्रकरणांमध्ये विविध न्यायालयात आरोपपत्रे दाखल झाली आहेत. नोकऱ्यांच्या घोटाळ्यासंदर्भात अटक केलेली पूजा नाईक ही पहिली महिला संशयित होती, त्यानंतर अनेक महिलांना अटक करण्यात आली.