For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयएस’शी संबंधित 12 संशयितांना अटक

06:10 AM Mar 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आयएस’शी संबंधित 12 संशयितांना अटक
Advertisement

आंध्र-दिल्ली पोलिसांची विविध राज्यांमध्ये संयुक्त कारवाई : महाराष्ट्रातील दोघांचा, कर्नाटकातील एकाचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘आयएस’सारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी बारा तरुणांना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे अनेक राज्यांमध्ये ही कारवाई केली. सूत्रांनुसार, आरोपी गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून परदेशी सूत्रधारांच्या संपर्कात आले. आरोपींमध्ये आंध्र प्रदेशातील रहमतुल्ला शरीफ, मिर्झा सोहेल बेग आणि मोहम्मद दानिश, बिहारमधील शादमान दिलकुश आणि अजमानुल्ला, दिल्लीतील लकी, बंगालमधील मीर अली, राजस्थानमधील झीशान, कर्नाटकातील अब्दुल सलाम, महाराष्ट्रातील शाहरुख खान आणि शियाक पियाज उर रहमान आणि तेलंगणातील सय्यदा बेगम यांचा समावेश आहे.

Advertisement

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक दहशतवाद निर्देशांकातून दहशतवादी संघटना आता गेमिंग अॅप्सच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करत असल्याचे स्पष्ट झाले होते. या निर्देशांकात उल्लेख असलेल्या अॅप्समध्ये डिस्कॉर्ड, ट्विच, रोब्लॉक्स आणि फोर्टनाइट यांचा समावेश आहे. या अॅप्सच्या माध्यमातून संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.  बहुराज्यीय कारवाईनंतर, अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (एक्यूआयएस) आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) यांसारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

विदेशातील सूत्रधारांशी संपर्कात असल्याचे उघड

अटक केलेले सर्व संशयित गेमिंग अॅपद्वारे ‘एक्यूआयएस’ आणि ‘आयएसआयएस’च्या परदेशी सूत्रधारांच्या संपर्कात होते. त्यांचे संबंध ‘आयएस’शी संलग्न असलेल्या गटाशी होते. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये राष्ट्रध्वजाच्या जागी ‘आयएस’चा ध्वज लावल्याचा आरोप आहे. तसेच भारताला इस्लामिक राष्ट्रात रुपांतरित करण्याचे समर्थन केल्याचे दिसून आले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी राष्ट्रगीताचीही खिल्ली उडवली आहे. ते एका महिन्याच्या आत प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला जाण्याची योजना आखत होते. तसेच ते इतर तरुणांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहितही करत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

Advertisement
Tags :

.