आयशर मोटर्सच्या नफ्यात 12 टक्के वाढ
06:48 AM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
रॉयल इनफिल्ड अर्थात आयशर मोटर्सचा मार्चअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून नफ्यात कंपनीने 12 टक्के आणि उत्पन्नात 16 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. निकाल घोषित होण्यापूर्वी कंपनीचा समभाग 1 टक्का वाढत बंद झाला होता. निकाल शेअरबाजार बंद झाल्यानंतर घोषीत करण्यात आला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वर्षाच्या आधारावर 11 टक्के वाढत 1520 कोटी रुपयांवर पोहचला होता. मागच्या वर्षी तो 1362 कोटी रुपयांचा राहिला होता. याचसोबत कंपनीचे उत्पन्न 16 टक्के वाढीसोबत 6080 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 5241 कोटी रुपये इतके उत्पन्न राहिले होते. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 करीता 1 रुपये फेस व्हॅल्युनुसार प्रत्येक इक्विटी समभागावर 82 रुपये अंतरीम लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी आता समभागधारकांची मंजुरी आवश्यक असेल.
Advertisement
Advertisement